सावली वनपरिक्षेत्रात वनकर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी - आरोग्य शिबिरात अनेकांनी घेतला लाभ
सावली: सावली वनपरिक्षेत्रात हिंस्त्र प्राणी व जंगली हत्तींचा सतत धुमाकूळ असल्याने वारंवार मानव वन्यजीव संघर्षाची घटना घडत असतात. त्यामुळे सावली वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वन कर्मचारी सतत कामात वन्यप्राणी बंदोबस्त, अवैध वृक्षतोड, अवैध शिकार, वन वणवा, अवैध अतिक्रमण, अवैध उत्खनन, अवैध चराई, तसेच कार्य आयोजना, रोपवन आणि जल व मृद संधारणाची कामे, तेंदू हंगाम न्यायालयीन कामे, शेतपिक व पशुधन हानी नुकसान भरपाई देण्याचे कामात सतत व्यस्त असताना वेळेचे बंधन नाही. त्यामुळे अनियमित जेवण व क्षेत्रीय कामे करताना मिळेल ते पाणी पिणे या सर्व कारणामुळे वन कर्मचाऱ्यांचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने व आरोग्य सुदृढ असल्याशिवाय कोणतेही काम दर्जेदारपणे व वेळेत करणे शक्य होणार नाही म्हणून सावलीचे वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद दुर्वे यांनी विभागीय वन अधिकारी चंद्रपूर प्रशांत खाडे व सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर विकास तरसे यांचे मार्गदर्शनाखाली मासमो केअर आयुर्वेदिक रिसर्च फाउंडेशन कडून व निवासा होमिओ चिकित्सालय कडून १० जूनला आरोग्य शिबिर आयोजित केले होते.
आयोजित शिबिरास डॉ. माधुरी नाकाडे डॉ. विजय वासनिक संस्थेच्या अध्यक्ष कोहिनूर धृतराज तसेच संस्थेचे उपाध्यक्ष शिल्पा ठाकरे, पूजा साखरकर, सचिन घारपुरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सदरचे शिबिराचा साठ वन कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला असून शिबिरास क्षेत्र सहायक श्री राजू कोडापे, नंदकिशोर पाटील, रवी सूर्यवंशी, अनिल मेश्राम, व वनरक्षक राजू मुरकुटे, लंकेश आखाडे, सुखदेव बोनलवर, भोलेश्वर सोनेकर, डांगे, एकनाथ खुडे, महेश अहिरकर, दिवाकर गुरूनुले, विनोद उईके व श्रीराम आदे आणि कार्यालयीन कर्मचारी घडसे लेखापाल व सतीश परसावार, सुभाष घोडे, पोटे, सीडाम, शेंडे, बंडू दुधे आणि पीआरटी चमू यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता मोलाचे सहकार्य केले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!