विद्युत तारेच्या स्पर्शाने दोन म्हशीचा मृत्यू;
तळोधी (बा.) नागभिड पोलिस स्टेशन अतंर्गत सावंगी बडगे येथिल रविंद्र तुकडु वाटगुरे यांचें मालकीच्या दोन म्हशी लोबकळणाऱ्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.
नेहमी प्रमाणे स्वतः चे आठरा म्हशी घरुन जंगल परिसरात चराईसाठी नेत असतांना गावाशेजारी रस्त्याचे कडेला विद्युत विभागांचे विद्युत पोल चे जिवंत तार लोंबकळत असतांना स्पर्श झाला. त्यात दोन म्हशी व एक कुत्र्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेची माहिती विद्युत विभाग, पोलिस विभाग, महसुल विभागाला देण्यांत आली असता घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. विद्युत विभागांचे अभियंता माटे, पोलिस विभागाचे पानसे, महसुल विभागांचे ग्राम अधिकारी विकास मेश्राम, पोलिस पाटील प्रविण रामटेके यांचे प्रत्यक्ष पंचनामा करण्यात आला. सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.



Sainath pipare
उत्तर द्याहटवा