"मामा"ने बनविले साडेसहा लाखांनी "मामा"- मूल भरती घोटाळा
"मामा"नेच बनविले भाच्याला "मामा"; नोकरीचं आमिष दाखवून ६.५ लाखांची फसवणूक – पोलिसात तक्रार"
मूल (ता. १६ जून) – नातेसंबंधाच्या नाजूक धाग्यांवर विश्वास ठेवून भाच्याने मामावर विश्वास ठेवला. पण याच "मामाने" आपल्या साथीदारासोबत संगनमत करून भाच्याला शासकीय नोकरीचं आमिष दाखवत तब्बल ६,५०,००० रुपयांनी गंडा घातला. नगरपरिषदेत बनावट भरती घोटाळ्यात आणखी एक कडी जुळली आहे. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात उघडकीस आला असून, फसवणूक झाल्याचा प्रकार मूल पोलिस ठाण्यात तक्रारीद्वारे नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, राहुल रामदास महाजनवार (वय ४०) हे मूळचे मूल तालुक्यातील रहिवासी आहेत. मूल पंचायत समिती येथे कंत्राटी वाहन चालक आहेत. मूल पचायत समितीमध्ये सरकारी नोकरी असून मंत्रालयातील वडाले नावाचे मोठे अधिकारी माझे परिचितचे असून त्यांचे मार्फत नोकरी लावून देण्याचे आमिष राजेश पुद्धटवार यांनी राहुल महाजन वारे यांना सांगितले. राजू हा राहुल यांचा "मामा" आहे.
पैसे घेतले, नोकरी दिली नाही; उलट उडवाउडवीची उत्तरे
तक्रारकर्त्याच्या मते, २४ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी राजू पुद्दटवार यांच्याकडे नोकरीसाठी रु. ६.५,००००/- रोख स्वरूपात दिले. पैसे घेतल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस ते नोकरीच्या प्रक्रियेविषयी विविध माहिती देत होते. मात्र त्यानंतर वेळकाढूपणा, खोटे आश्वासन आणि टाळाटाळ सुरू झाली.
राहुल महाजनवार यांनी पैसे परत मागितल्यावर, दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे देत अधिक वेळ मागितला. त्यांच्याकडून वारंवार दुर्लक्ष आणि फसव्या भाषा ऐकून अखेर तक्रारदाराने १४ जून २०२५ रोजी मूल पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.
पोलिस तपास सुरू; फसवणुकीचा गंभीर आरोप
तक्रारीनुसार, दोन्ही व्यक्तींनी संगनमत करून खोटी माहिती दिली, शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले, विश्वास संपादन करून रोख स्वरूपात मोठी रक्कम स्वीकारली आणि त्यानंतर कोणतीही सेवा न देता फसवणूक केली. गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नात्यांची विटंबना?
या प्रकरणात विशेष लक्षवेधी बाब म्हणजे तक्रारदाराने ज्यांना "मामा" म्हणून विश्वासाने व्यवहार केला, त्या व्यक्तीकडूनच आपली फसवणूक झाली. त्यामुळे नात्यांवरचा विश्वास डळमळीत करणारा आणि सामाजिक पातळीवर चिंता निर्माण करणारा हा प्रकार ठरतो. ग्रामस्तरावर अशा अनेक प्रकरणांची कुजबुज असली, तरी अत्यंत मोजकेच प्रकरणे थेट पोलिस ठाण्यात येतात.
---
"मी मेहनतीने कमावलेले पैसे त्यांच्या हाती दिले. शासकीय नोकरीच्या आमिषाने माझी फसवणूक झाली. मला न्याय मिळावा, आणि इतर कोणी अशा फसवणुकीचा बळी ठरू नये, म्हणूनच मी ही तक्रार दिली आहे," असे राहुल महाजनवार यांनी स्पष्ट केले.
--
या प्रकरणाचा तपास मूल पोलिसांकडून सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई होणार का, हे लवकरच स्पष्ट होईल. पीडितेला न्याय मिळतो का आणि नात्याच्या आड येणारे हे बनवे मामा कारागृहात जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
--
या घोटाळा प्रकरणात आरोप असलेले राजेश पुदटवार आणि नाना अक्केवार यांचे पैसे घेताना चे व्हिडिओ पब्लिक पंचनामा मध्ये प्रकाशित होतात ते प्रचंड वायरल झाले. अनेकांनी या प्रकरणावर संतापही व्यक्त केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!