गडचिरोली - चंद्रपूर हायवेवर अपघातास कारणीभूत काटेरी झुडपे - गुरुबक्षानी कन्स्ट्रक्शन कंपनीचे याकडे दुर्लक्ष

 

सावली - गडचिरोली चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गवरील सावली ते मुल दरम्यान रोडच्या कडेला असलेली झुडपे वाढून रस्त्यावर येत रहदारीस अडचण येत आहे मात्र देखभाल दुरुस्तीचे काम असणाऱ्या गुरुबक्षानी कन्स्ट्रक्शन कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे.

      गडचिरोली चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम गुरुबक्षानी कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी केले. या मार्गांवर अनेक अनेक झाडं होती ती झाडं काम करतांना कापण्यात आली. महामार्गाचे काम पूर्ण झालेले असतांना मात्र त्या ठिकाणी झाडं लावलेली नाही. मात्र सावली ते मुल दरम्यान महामार्गाच्या कडेला असलेली काटेरी झुडपे वाढत आहेत. काटेरी झुडपेच नवीन वृषलागवड म्हणून दाखवण्याचा प्रकार तर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून होत नसेल अशी शंका व्यक्त केल्या जात आहे. या झुडपांमुळे वाहनधारकांना प्रवास करण्यास अडचणी येत आहेत व अपघात घडत आहेत. मात्र देखभाल दुरुस्तीचे काम असणाऱ्या गुरुबक्षानी कन्स्ट्रक्शन कंपनीचे दुर्लक्ष दिसून येत आहे. 

     

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!