विजेच्या धक्क्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

चिमूर शहरातील बोरगाव येथील घटना

शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )

चिमूर : - दिनांक. ०९/०६/२०२५ चिमूर शहरातील एका २० वर्षीय तरुण युवकाचा अचानक आलेल्या पाऊस व कडाक्याच्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना दुपारी ०४:०० वाजता च्या सुमारास बोरगाव शेत शिवारात घडली.प्राप्त माहितीनुसार युवक मित्रांन सोबत चिमूर पासून जवळच ३ किमी अंतरावर असलेल्या बोरगाव शेत शिवारातील मार्गालगत असलेल्या हनुमान मंदीरात देव दर्शनासाठी गेले असता अचानक वातावरण बदलले व पाऊसासह विजेचा कडकडाट सुरू झाला आणि आकाशात जोरदार विज चमकली त्यामुळे विजेच्या धक्क्याने तरुण युवक नामे प्रथमेश अतुल वानखेडे वय २० वर्ष राहणार गांधी वार्ड चिमूर येथील मुलाचा जागीच मृत्यू झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!