आज सायंकाळपासून रेतीघाट बंद होणार - घरकुलधारक रेतीपासून वंचित राहणार

सावली - घरकुलधारकांना ५ ब्रास मोफत देण्याचा शासकीय परिपत्रक असल्याने सावली तालुका प्रशासनाने गाजावाजा करीत वाहतूक परवाने घरपोच वाटप केले. आता प्रत्येकी एक ब्रास रेती मिळायला सुरवात होता होता काहींना मिळाली तर काही प्रतीक्षेत असतांना वाळू धोरणात ९ जून नंतर रेती उपसा करण्याला बंदी असल्याने व तसा खनिखर्म विभागाचा आदेश आल्याने घरकुलधारकांच्या तोंडाला पाने पुसण्याची वेळ आली आहे.

       तालुक्यात प्रधानमंत्री आवास, शबरी आवास, यशवंतराव चव्हाण आवास, रमाई आवास योजनेनंतर्गत हजारो घरकुल मिळाले, पण रेतीचे काय असा प्रश्न अनेक घरकुल लाभार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. रेतीच्या टंचाईमुळे अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू केले नाही तर काहींनी अधिकच्या भावाने चोरीची रेती खरेदी करून बांधकाम सुरु केले मात्र तेही अर्धवट आहेत. शासनाने घरकुलधारकांना ५ ब्रास रेती देण्याचा निर्णय घेतला. सावली प्रशासनाने घरकुलधारकांना घरपोच वाहतूक परवाने २१ मे पासून वाटप सुरु केले. मात्र नदीत पाणी असल्याने वा पाऊस आल्याने आठवडाभर रेती काढता आली नाही. त्यानंतर घरकुलधारकांना प्रत्येकी एक ब्रास रेती काहींना मिळाली तर अर्ध्यापेक्षा जास्त घरकुलधारक प्रतीक्षेत असतांना खनिकर्म विभागाने ९ जुनच्या सायंकाळी ६ वाजता नंतर रेती घाटाच्या रस्त्यावर खड्डे खोदून घाट बंद करण्याचा आदेश दिल्याने घरकुलधारकांना मिळणारी रेती बंद होणार आहे. हा प्रकार घरकुलधारकांच्या तोंडाला पाने पुसणारा असल्याची चर्चा आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!