अषित प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.२३/०६/२०२५ पवनी येथील अषित प्राथमिक शाळेत नुकताच शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. व या
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष भीमराव वाहने तसेच व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रणजितभाऊ शिवरकर, सदस्या पल्लवी मुंडले, माजी उपसरपंच पुरुषोत्तम रामटेके,वंदना रामटेके,राजेंद्र तिघरे, राजेंद्र चन्नावार,शाळेचे मुख्याध्यापक राकेश बिसने आदिंची उपस्थिती होती.यावेळी शाळेच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी बोलताना प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि शिक्षणाचे महत्त्व विषद केले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला, तर शिक्षकांनी शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी शुभम सुखदेवे व शैलेष रामटेके यांनी विद्यार्थ्यांना नोटबुक भेट दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक गिरी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयागराज भोयर,मुरलीधर जिवतोडे,अंगणवाडी सेविका विजुमाला साखरकर,सविता राऊत, करुणा वाघमारे,धनश्री मुंडले,प्रमिला बिसने तथा शालेय विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून,शाळेच्या शैक्षणिक वाटचालीस यातून बळ मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!