पतसंस्थेचे कर्ज बुडविने पडले महागात-कर्जदारास एक महिना कारावास
पतसंस्थेचे कर्ज बुडविणे भाजीपाला व्यावसायिकाला पडले महागात कर्जदारास एक महिन्याच्या कारावासासह कर्जाची थकीत रक्कम भरण्याचे न्यायालयाचे आदेश
मूल येथील भाजीपाला व्यावसायिकाला पतसंस्थेचे कर्ज बुडविणे चांगलेच महागात पडले आहे. पतसंस्थेचे कर्ज वसुलीसाठी न्यायालायात दाखल केलेल्या प्रकरणाचा निकाल तिसरे अतिरिक्त मुख्य न्यायाधीस डी. ए. तिवारी यांनी दिला आहे. यात कर्जदार भाजीपाला व्यावसायिकाला एक महिन्याच्या कारावासासह थकीत कर्ज व व्याज रकमेसह नुकसानभरपाईपोटी २ लाख ३६ हजार रुपयांचा भरणा दोन महिन्यात करण्याचा निकाल दिला आहे. सदर रकम न भरल्यास एक वर्षे कारावासाची शिक्षाही सुनावली आहे. भाजीपाला व्यावसायिक विजय धर्मराव घोनमोडे यांनी चंद्रपूर जिल्हा मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्थेकडून २०१४ मध्ये ४० हजार रूपये कर्जाची उचल केली होती. सदर कर्जाची पतसंस्थेने मागणी करूनही घोनमोडे यांनी कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे पतसंस्थेने तिसरे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश यांच्या न्यायालयात पराक्राम्य लेख संहिता कलम १३८ अन्यवे फौजदारी प्रकरण दाखल केले. न्यायालयाने पतसंस्थेने सादर केले पुरावे व बाजू लक्षात घेता विजय घोनमोडे याना थकीत कर्जासाठी दोषी ठरविले. दरम्यान, १६ जून रोजी अतिरिक्त मुख्य न्यायाधीश डी. ए. तिवारी यांनी निकाल देताना विजय घोनमोडे याला एक महिन्याचा कारावास व थकीत कर्ज व व्याज रकमेसह नुकसानभरपाई पोटी २ लाख ३६ हजार रुपयांचा भरणा दोन महिन्यांत करण्याचा निकाल दिला आहे. सदर रक्कम विहीत मुदतीत न भरल्यास एक वर्षे कारावासाची शिक्षाही ठोठावली आहे. पतसंस्थेतर्फे ॲड. अजित भडके यांनी न्यायालयात बाजू मांडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!