समाजसेवक शुभम पसारकर यांना महाराष्ट्र महागौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - रोडवरील,बेघर,बेवारस, भिक्षेकरी,निराधार, अनाथ,मनोरुग्ण बांधवांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या शुभम राजू पसारकर यांना महाराष्ट्र महागौरव २०२५ राज्यस्तरीय पुरस्कार पुणे येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.दिव्यवंदना आधार फॉऊंडेशनच्या माध्यमातून शुभम पसारकर गेली अनेक वर्षे अनाथ मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचे कार्य चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात करीत आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांनी शुभम पसारकर यांची महाराष्ट्र महागौरव राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली.हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे,आयुष्यमान भारत महाराष्ट्र राज्य समिती अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे,डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष राजा माने यांचे उपस्थितीत पुणे येथे २५ मे २०२५ रोजी शुभम पसारकर यांना प्रदान करण्यात आला.मानपत्र, स्मृतीचिन्ह,शाल व श्रीफळ देऊन शुभम पसारकर यांना गौरविण्यात आले.अनाथ मनोरूग्णांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या शुभम पसारकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.अनाथांच्या पुनर्वसनासाठी शक्य होईल ते कार्य करण्याचा प्रयत्न शुभम पसरकार हे करत असून या पुरस्कारामुळे जोमाने कार्य करण्याची पुनःश्च प्रेरणा जागृत होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!