जिल्हा दारु मुक्त करण्यासाठी आमदारांचे घरात भाई रजनीकांत यांचे लक्ष्यवेधी सत्याग्रही धरणे.
- राष्ट्रसंत,गाडगे महाराज,डॉ. भाउसाहेबांची कर्मभूमी अमरावती जिल्हा दारु मुक्त करण्यासाठी आमदारांचे घरात भाई रजनीकांत यांचे लक्ष्यवेधी सत्याग्रही धरणे.
आज दि.२०मे रोजी अमराव ती विधानसभा मतदार संघा च्या आमदार मा.सुलभाताई खोडके,व मा.संजयभाउ खोडके,आमदार विधान परिषद,यांचे गाडगेनगर, अमरावती निवास स्थानां त,दारु मुक्ती आंदोलनाचे महाराष्ट्र संयोजक भाई रजनीकांत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,वैराग्य मुर्ती गाडगे बाबा,शिक्षण महर्षि डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या महापुरुषांची कर्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यात व राष्ट्रसंताचे निवास राहिलेली, कर्मभूमी व महाराष्ट्र सरकारने पवित्र तिर्थक्षेत्र घोषित केलेले गुरु कुंज(मोझरी)१० किलो मिटर परिसर तातडीने दारु मुक्त करावा,जिल्ह्यातील अवैध दारु विक्री दुकाने ३०जूनपूर्वी बंद करावीत, दारु व्यसनामुळे मृत्यू झालेल्यांचे वारसांना १० लाख भरपाई मिळावी,व त्या कुटुंबाचे सर्वांगिण पुनर्वसन करावे,राज्यातील शेगांव,पंढरपूर,तुळजापूर,देहू,आळंदी,शिर्डी,सिंदखेड(राजा)आदि तिर्थक्षेत्रात तात डीने दारु बंदी,मध्यप्रदेश मधील भाजप सरकारने मुख्यमंत्री मा.मोहन यादव यांनी राज्यातील प्रसिध्द१९ तिर्थक्षेत्रात १एप्रिल २०२५ पासून,राज्यातील मान्यवर साधुसंतांचे आग्रहामुळे देशी,विदेशी दारुची दुकाने संपूर्णपणे बंद केलीत, त्याप्रमाणे तातडीने महाराष्ट्र सरकारने राज्यातील घोषित तिर्थक्षेत्राचे १० कि.मि.तेथिल पावित्र्य, मांगल्य व लाखोंचे संख्येत असणाय्रा भक्ताच्या भावना जपण्यासाठी दारुबंदी करावी.शरीरास हानीकारक (विषारी)असणारी देशी, विदेशी दारु उत्पादन करणारे राज्यातील सर्व कारखाने बंद करावेत, करोडो लाडक्या मतदार बहिणीचे संसार उध्वस्त करणारी दारु ,व दारुडे नवरे रोज महिलांवर अत्याचार करतात,भारतीय राज्यघटने चे परिच्छेद ४७ मधे दारु मादक द्रव्य आहे,त्यावर राज्य सरकारने बंदी घालावी नमुद आहे.तसेंच महिलांना त्यांचे अवयवावरुन शिव्या देण्याचा कडक दंडनीय कायदा करावा,आदि महत्त्वपुर्ण मागण्यांचे हे निवेदन देण्यात आले.व त्याप्रमाणे त्वरीत अंमल बजावणी न केल्यास आमदारांना गांवबंदी,रस्ता बंदी सत्याग्रह करण्याचा इशारा दिला ,सक्त बजाव ण्यात आले.दारु मुक्ती आंदोलनाचे वतीने नागपूरचे अधिवेशनाचे वेळी दि.१९ व २० डिसे.२४ला शेकडो स्री पुरुषांनी दारुबंदीकरीता धरणे दिले, मुख्यमंत्र्यांकडे अतुल सावे, मंत्र्याने निवेदन स्विकारले व १महिन्यात चर्चेस व निर्णय घेण्यास मुंबईला बोलाविण्यात येईल, सांगितले,५महिने झालेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसचे लबाड सरकारचे अजून निमंत्रण आले नाही,त्या निवेदनाची प्रत कार्यवाही करीता, आमदारांचे कार्यालयीन सचिव श्री.अमित तायडे यांना सुपुर्द करण्यात आले, दारुचे शरीरावर होणारे दु:ष्परिणाम होणारे मेंदू, हृदय किडनी,दृष्टी, फुफ्फुसे, आंतडे सडने,नंपुसक होणे,हाडे ठिसुळ व अशा१२ गंभिर आजाराचे ज्यामुळे दारु व्यसनींचा लवकर मृत्यू होतो,ते चित्र आमदारांचे माहितीसाठी सादर करण्यात आले. त्यावेळी श्री. श्रीधर भिसे, दारु मुक्ती आंदोलनाचे जिल्हा संघटक,कैलास वासुदेवराव कुलट,प्रदिप कोठारी,भास्कर उचितकर, मोझरी परीसरातील गुरुदेव मंडळ निवडक कार्यकर्ते उपस्थित होते. गुजरात राज्यात भाजपचे सरकार आहे,व तेथे ६५ वर्षापासून दारु बंदी कायदा आहे,दारु पासून कोणतेही उत्पादन राज्याला नाही,तरी राज्याचा प्रचंड विकास होत आहे, यांची माहिती निवेदनासोबत देण्यात आली. प्रति,मा.संपादक,वृत्त प्रतिनिधी, दै......... स.न. महोदय,वरील वृत्त तातडीने प्रसिध्दीस द्यावे,ही विनंती. भाई रजनीकांत,संयोजक, दारु मुक्ती आंदोलन,म.रा. हो.८००७९९४०९१/



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!