विरई येथे भीषण दुर्घटना : विद्युत तार तुटल्याने पाच म्हशींचा जागीच मृत्यू
ब्रेकिंग न्यूज
विरई येथे भीषण दुर्घटना : विद्युत तार तुटल्याने पाच म्हशींचा जागीच मृत्यू
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी जोर धरते
आज सकाळी विरई येथे एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. शेतशिवारात चराईसाठी गेलेल्या पाच म्हशी तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्युमुखी पडल्या. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत्युमुखी पडलेल्या म्हशींपैकी चार म्हशी शंकर मोहुर्ले यांच्याआहेत, तर एक म्हैस मुरली सोनुले यांची आहे. ही घटना घडताच स्थानिकांनी महावितरणला तातडीने माहिती दिली, मात्र अनेक तास उलटून गेले तरीही प्रशासनाच्या वतीने कोणतीही कारवाई झालेली नाही.
ग्रामीणांच्या मते, जुन्या आणि झुकलेल्या विद्युत तारांची देखभाल वेळोवेळी न केल्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून, या नुकसानाची भरपाई महावितरणने तातडीने द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ करत आहेत.
शेतकरी कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधनच हिरावल्याने संतप्त नागरिकांनी निषेध व्यक्त केला असून, दोषींवर कठोर कारवाईचीही मागणी होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!