शंकरपूर येथील गेल्या अडीच वर्षापासून ग्रामस्थ पाणी विनाच - अशोक चौधरी उपसरपंच शंकरपूर
जल जीवन मिशन अंतर्गत शंकरपूर येथे पाणीपुरवठा योजना ठरली कुच कामी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात शंकरपूर येथे जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत हर घर नल हर घर जल योजनेचे गेल्या अडीच वर्ष अगोदर दिनांक. 22 डिसेंबर 2022 ला माननीय नामदार गुलाबराव पाटील मंत्री पाणीपुरवठा महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते भूमिपूजन चा कार्यक्रम करून शंकरपूर ग्रामस्थांना हर घर नल हर घर जल मिळेल असे सांगण्यात आले होते तेव्हा पासून शंकरपूर ग्रामस्थांना पाण्याची आस लागली आहे. परंतु या योजने चे अजून पर्यंत पाणी न मिळाल्याने ही योजना कुचकामी ठरत आहे.या योजनेकरिता शंकरपूर गावाला अंदाजे ७०० लक्ष रुपये निधी मंजूर केले गेले व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागाच्या देखरेखी खाली कंत्राट मे.ज्योती कंट्रक्शन कंपनी चंद्रपूर यांना दिले.या कामासाठी गेल्या अडीच वर्षांपासून शंकरपूर गावातील रस्ते व भूमिगत गटारे फोडून ठेवल्याने गावातील नागरिक त्रस्त झाले आहे.भूमिगत गटारे फोडून पाईपलाईन टाकली मात्र अंदाजपत्रकानुसार रस्त्यांची झालेली नुकसान जसेच्या तसे बनवून देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. गावातील लोकांना गेल्या अडीच वर्षापासून याचा त्रास होत आहे त्यामुळे फोडलेले रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावी व संबंधित काम ग्रामपंचायतचे नसून ग्रामपंचायत इतका मोठा बोजा सहन करू शकत नाही कंत्राटदाराकडून फोडलेले कांग्रेट रस्ते व भूमिगत गटारे दुरुस्त करण्याचे काम दीर्घ काळापासून प्रलंबित आहे संबंधित कंत्राट दाराने काम सुरू करून गावातील रस्ते फोडून ठेवले आहे पूर्ण पने १०० % नळ जोडणी पण केली नाही त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे यासंदर्भात गेले अनेक पत्र व्यवहार केली आहे. तरी देखील मात्र कोणतेही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही गावातील वाहतुकीस अडथळे निर्माण होतात तसेच पावसा मुळे साचणाऱ्या पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात संबंधित विभाग या कंत्राटदाराशी हात मिळवणी करून नागरिकांना भूलथापा देण्याचा प्रयत्न करीत आहे.गावात झालेले काम अंदाजपत्रकानुसार झाले नाही पाईप लेवल बरोबर नाही पाईप बरोबर वापरले नाही रेती सिमेंट निकृष्ट दर्जाचे वापरले गेले आहे याची माहिती संबंधित विभागाला पत्राद्वारे अनेकदा करून सुद्धा कोणतीही कंत्राटदारावर कारवाई केली नाही याचा अर्थ असा होतो की संबंधित विभाग यांनी कंत्राटदाराशी हात मिळवणी केली आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित विभाग व कंत्राटदार याच्यावर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शंकरपूर ग्राम पंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी व ग्रामस्थ करीत आहेत. येत्या पंधरा दिवसात घरपोच पाणी न मिळाल्यास शंकरपूर गावच्या समस्त महिला संबंधित विभागासमोर घागर मोर्चा घेऊन आंदोलन करणार असल्याचे पत्र पाणीपुरवठा विभागाल दिले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!