सावली बाजार समितीची मतपेटी सिलबंद - तिसऱ्या आघाडीमुळे निवडणुकीत चुरस @ उद्या सेवा सहकारी संस्था सहकारी गटातील कोण गुलाल उधळणार याकडे लक्ष!
सावली - सावली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक 6 एप्रिलला पार पडली असून 17 जागेसाठी 37 उमेदवारांनी गड लढवीला. सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटात तीन पॅनल असल्यामुळे निवडणूक रंगतदार झाल्याचे दिसून आले. चूरशीत पार पडलेल्या मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने राहील हे सोमवारी पार पडणाऱ्या मतमोजणीनंतर दिसून येणार आहे.
सावली कृषी उत्पन्न बाजार समितीची सदस्य संख्या 18 असतांना आर्थिक दुर्बल गटात उमेदवार नसल्याने 17 जागेसाठी आज निवडणूक पार पडली. सहकार क्षेत्रातील सर्वसाधारण गटात 7 उमेदवार निवडून द्यायचे असतांना शेतकरी परिवर्तन पॅनलचे 7, शेतकरी जनता परिवर्तन पॅनलचे 7 व शेतकरी सहकार पॅनलचे 3 उमेदवार एकूण 17 उमेदवार रिंगणात होते. या गटातील निवडणूक पार चूरशीची दिसून आली. महिला गट, इतर मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमातीत दोनच पॅनल समोरासमोर असल्याने थेट लढत आहे. ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण गटात एका पॅनलकडे 2 उमेदवार तर दुसऱ्या पॅनलकडे 1 उमेदवार व तिसरा उमेदवार अपक्ष होते. अनुसूचित जाती जमाती गटात दोन पॅनल समोरासमोर होते. व्यापारी गटात दोन पॅनल तर मापारी हमाल गटात दोन पॅनल समोरासमोर रिंगणात होते. सहकार गटातील 424 मतदारापैकी 415 मतदारांनी, ग्रामपंचायत गटातील 447 मतदारापैकी 428 मतदारांनी, व्यापारी गटातील 154 पैकी 146 मतदारांनी, मापारी हमाल 36 मतदारापैकी 36 संपूर्ण मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटात चूरशीची निवडणूक झाल्यामुळे सोमवारी होणाऱ्या मतमोजणीनंतरच निकाल स्पष्ट होईल. मात्र शेतकरी सहकार पॅनलच बहुमतात येणार हे मतदारांच्या चर्चेतून स्पष्ट दिसून आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!