चिमूर शहरात पोलिसांनी काढला रूट मार्च

रूट मार्च च्या माध्यमातून जनतेला दिला शांततेचा ईशारा 

शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )

चिमूर : - दिनांक. ०५/०४/२०२५ ला सायंकाळी ०६:०० वाजता  चिमूर पोलिसांनी पोलीस स्टेशन पासून ते शहरातील मुख्य मार्गाने व गजबजलेल्या वस्तीतून रूट मार्च काढले. चिमूर पोलिसांनी या रूट मार्चच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी चिमूर पोलिस आहेत असा विश्वास दर्शविला. आणि सध्या भारतात सुरु असलेल्या स्थिती ला बघून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. यावर आढा घालण्यासाठी गुंड प्रवृत्तीला संपविण्यासाठी आणि समाजा - समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी तथा रामनवमी व भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनुषंगागे हा रूट मार्च पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम नवखरे सह सर्व पोलिस पथक तथा होमगार्ड सोबत घेऊन काढण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!