अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना भारतीय जनता पार्टी च्या महिला तालूका अध्यक्षांचा ट्रॅक्टर जप्त
नायब तहसीलदार तथा पोलीस पथक यांची धडक कारवाई
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात अवैधरित्या रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याची चर्चा जोमात सुरू असतांना चिमूर तहसील चे तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी फिरते पथक व स्थायी पथक तयार करून रेती चोरट्याना पकडण्याची मोहिम हाती घेतली असता दिनांक. ०४/०४/२०२५ ला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची दोन ट्रॅक्टर अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना पकडून चिमूर तहसील ला जप्त करण्यात आली हि घटना ताजी असतांनाच दुसऱ्या दिवशी दिनांक.०५/०४/२०२५ रोजी रात्रीच्या अंधारात पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय कॉलेज चिमूर येथील चौकात गस्तीवर असलेल्या चिमूर तहसील च्या स्थायी पथकाने तहसीलदार राजमाने यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार सूर्यकांत पाटील, रवींद्र चिडे मंडळ अधिकारी, शुभम बदकी तलाठी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे व त्यांच्या पाथकांनी मिळून विना नंबर रेती ची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ला पकडून हि कारवाई केली.याची चर्चा संपूर्ण चिमूर तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात रंगली असून सत्ताधारी राजकीय पक्षाच्या महिला तालूका अध्यक्ष व पदाधिकारी कारकर्त्यांनीच चोरीचा उपक्रम सुरु केला असेल तर लोकप्रतिनिधी यांचेकडून जनतेला न्याय कशाप्रकारे मिळवून देतील यावर? निर्माण झाला आहे.


सत्ताधारी आमदारानीं कार्यकर्त्यांना अवैध्य धंदे बंद करण्यास सांगून असे धंदे केल्यास स्वतः पुढाकार घेऊन त्याच्यावर कार्यवाही करण्यास प्रशासनाला स्वतः आदेश देऊन त्याच्यावर कठोर कार्यवाही करावी.
उत्तर द्याहटवा🙏🏼🙏🏼