वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार - परिसरात महिन्याभरातील तिसरी घटना
चितेगांव रहिवासी शेषराव नागोसे हा आपल्या वडिलासोबत शेतात पिकाला पाणी देत असतांना वाघाने हल्ला केला व परपटत नेत शरीरापासून डोके वेगळा करीत ठार केले. या परिसरात महिन्याभरात निलेश कोरेवार, मला येगावार या दोन मेंढपाळाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वनविभागाने वाघास जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले मात्र हुलकवणी दिल्याने फिंजऱ्यात आलाच नाही. वाघाने हल्ला सावली वनपरीक्षेत्रात केलेला असून मृतदेह चिचपल्ली वनपरीक्षेत्रात आढललेला आहे. आज तिसरी घटना घडल्याने वनविभागाचे विरोधात परिसरात संताप व्यक्त केल्या जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!