कीस्टोन फाउंडेशन, चेन्नईच्या टीमचा चंद्रपूरमधील वनहक्क गावांचा अभ्यासदौरा

कीस्टोन फाउंडेशन, चेन्नईच्या टीमचा चंद्रपूरमधील वनहक्क गावांचा अभ्यासदौरा

कीस्टोन फाउंडेशन, चेन्नई येथील श्री. बगवनिधी आणि श्री. एनियन रामास्वामी यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थान च्या   प्रकल्प अंतर्गत कार्यरत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वनहक्क गावांना नुकताच अभ्यासदौरा केला.

या दौऱ्याचा उद्देश सामुदायिक वनहक्क व्यवस्थापन आराखडा तयार करण्यातील प्रक्रिया तसेच CFR क्षेत्राच्या व्यवस्थापनात ग्रामसभेच्या सक्रीय सहभागाची समज प्राप्त करणे हा होता. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी ग्रामसभा मुंडाळा या गावाला भेट दिली. येथे त्यांनी ग्रामसभेने आपल्या CFR क्षेत्राचे प्रभावी व्यवस्थापन कसे केले आहे हे जवळून पाहिले. CFR क्षेत्रात मनरेगा  अंतर्गत २५,००० पेक्षा अधिक विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थांच्या उपजीविकेत सुधारणा झाली असून हंगामी स्थलांतरही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

दुसऱ्या दिवशी त्यांनी CFR गाव चोरगावला भेट दिली. येथे त्यांनी CFR व्यवस्थापन समिती (CFRMC) सदस्य आणि गावकऱ्यांशी संवाद साधून CFR क्षेत्राचे संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन यासंदर्भातील अनुभव जाणून घेतले. यामध्ये नोंदवही ठेवण्याची प्रक्रिया आणि समुदाय आधारित संवर्धन उपक्रमांवर चर्चा झाली.

> *"TISS टीमने CFR अंमलबजावणीत मोठा बदल घडवून आणण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या अभ्यासदौऱ्यातून आम्हाला मौल्यवान अनुभव आणि शिकवण मिळाली,"*  
– **श्री. एनियन रामास्वामी**, कीस्टोन फाउंडेशन, चेन्नई

या दौऱ्यात TISS तर्फे श्री. नितीन ठाकरे, श्री. अमोल कुकडे, श्री. जगदीश डोलसकर आणि श्री. प्रवेश सुटे यांनी मार्गदर्शन व भाषांतराची भूमिका बजावली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!