पोलीस स्टेशनवर दगडफेक व जाळपोळ प्रकरणी दोघांची जेल रवानगी
अनेक आंदोलन कर्त्यावर गुन्हे दाखल
चिमूर शहरात तणावाचे वातावरण कायमच
पोलिसांचा चिमूर शहरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक. 14 एप्रिल 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात खाऊचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी जनतेचा चिमूर पोलीस स्टेशनला घेराव व टायर जाळून आरोपीस फासीची शिक्षा करा अशी मागणी करीत आंदोलन करण्यात आले.जनतेचा मोठया प्रमाणावर आक्रोश बघता पोलिसांनी जनतेवर सौम्य लाठीचार्ज करीत तणावावर शांतता मिळविण्याचे प्रयत्न केले.परंतु प्रकरण शांत न होता जनतेनी त्या उलट भूमिका बजावली आणि पोलिसांवरच दगदफे करून पोलिसांना जखमी करण्यात आले. यात पोलीस वाहन चालक महिला गंभीर जखमी झाल्या असून होमगार्ड पाथकातील शिपाई यांचा हातहि मोडल्या गेला व पोलीस स्टेशन च्या काचा सुद्धा दगडाणे फोडण्यात आल्या हा सर्व प्रकार लक्षात घेत दिनांक.15/04/2025 ला गुंडगिरी प्रवृत्ती शहरात वाढू नये म्हणून (1) निखिल भुते (2) लल्ला असावा (3) पंकज शिरभये (4) शुभम भोपे (5) राकेश सटोणे (6) बबलू जाधव (7) गोलू भरडकर (8)
धीरज सातपैसे (9) संदीप कावरे (10) तेजस बोरसरे (11) विक्की कटारे (12) मनमीत कुंभारे (13) गौरव गौरकर (14) हर्ष कटारे (15) पवन बंडे (16) गोलू कापसे (17) विशाल सोरदे व इतर जणांवर अपराध क्र.151/2025 कलम 189(2), 189(5), 191(2), 191(3), 195(1), 195(2), 190, 192, 132, 121(1), 329(4), 130 BNS सहकलम 3 सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर (1) राम गुलाब माने वय 39 वर्षे राहणार इंदिरा नगर चिमूर (2) अभिषेक रमेश डायरे 24 वर्षे राहणार ठक्कर वार्ड चिमूर या दोघांना चंद्रपूर जेल रवानगी करून 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.यामुळे सध्यास्थितीत चिमूर शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसून ठिकठिकाणी याबाबत चर्चा रंगली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!