अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे चोरटे झाले सक्रिय
दररोज दिवस, रात्र रेतीचे उत्खनन सुरूच - मात्र तहसील महसूल प्रशासन कोमात
तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यात अवैधरित्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टर तथा हायवा द्वारे मोठ्या प्रमाणावर दैनंदिन चोरटा उपक्रम सुरु असून महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. तालुक्यातील वरोरा, माढेळी, बोडखा, खांबाळा, शेगाव, आबमक्ता, सोईट, साखरा, दिदोडा, खेमजई,पोहा,आजगाव,पाचगाव, अर्जुनी,अर्जुनी तुकुम, बेंबळा, चारगाव,वायगाव,या परिसरात छोटे नाले, नदीतील रेतीची अवैधरित्या वाहतूक केली जात असून रेतीची वाहने अगदी महसूल कार्यालय, तलाठी, कार्यालय समोरूनच याची वाहतूक करीत असल्याने अधिकाऱ्यांची या माफियासोबत हातमीळवणी तर नाही ना असा? जनतेला उपस्थित झाला आहे. या रेती चोरीच्या वाहतुकी दरम्यान अनेक ठिकाणी चालक व वाहक तसेच अनेक मजुरांनी स्वतःचा जिव सुद्धा गमविला आहे रात्रीच्या अंधारात बिनधास्त पणे रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरू असून याकडे महसूल प्रशासन यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येते, कसल्याही प्रकारची यांच्यावर कारवाई होत नसल्याने रेती घाट लिलाव न झाल्याने रेतीची मागणी तालुक्यातील गावात मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे येते चोरट्यांची सध्याच्या स्थितीत चांदीच - चांदी असल्याचे नागरीकांकडून बोलले जात आहे. तालुक्यातील अनेक रेती घाटावर, परिसरातील छोटी नदी, नाले येथून बिनधास्त पणे रेती उत्खनन व वाहतूक सुरू असून पूर्णतः रेती मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.या अवैद्य रेती माफियाकडे महसूल प्रशासन का बरं लक्ष देत नाही असा प्रश्न ? वारंवार नागरिकांमध्ये उपस्थित होत असल्याने जनतेचा शासकीय यंत्रनेवरील विश्वास गमाविण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात संबंधित प्रतिनिधीनी माहिती घेण्यासाठी वारंवार फोन द्वारे संपर्क केला असता वरोरा तहसीलदार यांचा संपर्क होऊ शकला नाही. यावर कारवाई व्हायला हवी म्हणून तहसीलदार यांचेकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!