आमदार करण देवतळे यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलन; शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेरखान पठाण यांच्या नेतृत्वात आंदोलनकर्ते शेतकरी हातात मशाल, भगवे झेंडे आणि गळ्यात निळा दुपट्टा घालून आमदारांच्या निवासस्थानाबाहेर जमले होते.हे आंदोलन मुख्यतः शेतकऱ्यांची कर्जमाफी, पेरणी व खते/बियाणे यासाठी MREGS (रोजगार हमी योजना) अंतर्गत अनुदान मिळावे, तसेच दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये मानधन मिळावे यासाठी करण्यात आले होते. आंदोलकांनी सांगितले की, सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप झालेली नाही. सततच्या नैसर्गिक आपत्ती, महागाई आणि बँकांच्या दबावामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घरासमोर थांबवून संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र काही शेतकरी आमदारांच्या घरी जाऊन मागण्यांचे निवेदन देण्यात यशस्वी झाले. आमदार देवतळे घरी नसल्यामुळे त्यांनी फोनवर आंदोलकांशी संवाद साधत निवेदन स्वीकारले आणि मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!