जांभुळघाट येथे सकाळी पाच वाजे पासुन अवैधरित्या मुरमाचे उत्खनन सुरू

मुरूम उत्खननाकडे महसुल विभागा चे दुर्लक्ष

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमूर तालूक्यात गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज दिनांक.११/०४/२०२५ मौजा जांभुळघाट येथे सकाळच्या पाच वाजे पासुन ठेकेदाराचे मुरमाचे उत्खनन सुरू आहे.काही दिवसा पासुन अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणाऱ्यावर कार्यवाही होत आहे. त्यामुळे रेती तस्कर थोडे शांत बसले आहे.पण मुरूम उत्खनन करणाऱ्यावर आता पर्यंत तालूक्यात कोणतीही मोठी कार्यवाही महसुल विभागा कडून करण्यात आली नाही.तालूक्यात ६० टक्के मुरमाचे उत्खनन अवैध होत आहे.१०० ब्रास ची परवानगी असतांना ५०० ब्रास मुरमाचे उत्खनन केले जातात. ३ ते ४ दिवसाची पर्वांनगी दिली जात असते पण ती पर्वांनगी पंदरा ते विस दिवस मुरूम उत्खनन करणारा ठेकेदार चालवित असतात.नियम बाह्य मुरमाचे उत्खनन ठेकेदारा कडून होत आहे.जेव्हा मुरमाचे गाड्या भरून निघत असतात तेव्हा प्रत्येक गाडी ला रॉयल्टी देणे बंधनकारक असते.पण ती दिली जात नाही.रॉयल्टी बुक दाखविण्यासाठी ठेकेदार ठेवीत असतात. तोच रॉयल्टी बुक मुरूम उत्खनन करणारा ठेकेदार पंधरा ते विस दिवस चालवतात.पुन्हा तहसील मध्ये जाऊन उत्खननाची तारीख ठेकेदार वाढवून घेत असतात.जेव्हा ठेकेदारा कडून उत्खनन केले जातात नंतर त्या उत्खननाची महसुल विभागा कडून मोजनी करने आवश्यक असते पण महसुल विभागा कडून केली जात नाही.म्हणूनच ठेकेदार हे पाच ते दहा पट मुरूमा चे उत्खनन करीत आहे. जांभुळघाट येथे मुरमाची खदानीचे स्वरूप आले आहे. पंनास ते साठ एकर मध्ये मोठ्या प्रमाणात मुरमाचे उत्खनन झाले आहे.हजारो ब्रास येथे अवैध मुरूमाचे उत्खनन झाले आहे.महसुल विभागा कडून मुरूम उत्खननाची चौकसी करण्यात यावी अशी गावाकऱ्यांची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!