राजुरा उपविभागीय कार्यालयावर श्रमिक एल्गार संघटनेचा धडक मोर्चा

राजुरा उपविभागीय कार्यालयावर श्रमिक एल्गार संघटनेचा धडक मोर्चा 


राजुरा प्रतिनिधी - 
दिनांक १०/०३/२०२५

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अमर रहे- लढेंगे जितेंगे, श्रमिक एल्गार जिंदाबाद, अशा घोषणा देत आज श्रमिक एल्गार संघटनेचा धडक मोर्चा भवानी मंदिर पासून राजुरा उपविभागीय कार्यालयावर धडकला. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोर्चा उपविभागीय कार्यालयाकडे निघाला, वनहक्काचे पट्टे देण्यात यावे, निराधार महिलांचे अर्ज मंजूर करण्यात यावे, घरकुलासाठी रेती उपलब्ध करण्यात यावी, घरकुलाची रक्कम पाच लाख करण्यात यावी, टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी, बेरडी जुनी येथील प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र देण्यात यावे, जिवती तालुक्यातील आदिवासींच्या जमिनींना संरक्षण देण्यात यावा, गैरआदिवासीच्या ताब्यात असलेल्या जमिनी आदिवासींना परत करण्यात यावे , बागुलवाही, घाटाराईगुडा गावाला गावठाण घोषित करण्यात यावे यासह अनेक मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी शिष्ठमंडळाने
उपविभागीय अधिकारी कश्मिरा संखे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी श्रमिक एल्गार च्या अँड. पारोमिता गोस्वामी, विजय सिद्धावार, ट्रायबल डेव्हलपमेंट कल्चरल फाउंडेशन चे अध्यक्ष, घनशाम मेश्राम, शामराव कोटनाके यांनी मार्गदर्शन केले, तसेच मोर्चात तुळशीराम किंनाके, विजय नक्षीने, जगदीश सिडाम, लच्चू मडावी, सुरेश कोडापे, विमल कोडापे, सुनील गेडाम, पवन ताकसांडे, सुभाष कुमरे, यांनी मोर्चा यशस्वी केला, मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा राष्ट्रगीताने समाप्त करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!