महाशिवरात्री महोत्सव समितीचा उपक्रम;

महाशिवरात्री महोत्सव समितीचा उपक्रम; 

 नागभिड तालुक्यातील पत्रकारांचा आमदार बंटी भांगडिया यांचें कडुन  सत्कार 




तळोधी (बा.):- लोकशाहीच्या चौथ्या स्तंभ म्हणून ज्यांची ओळख आहे असा पत्रकारांचा नागभिड येथे महाशिवरात्री महोत्सवात चिमुरचे आमदार बंटी भांगडिया यांनी सन्मानित केले.
     महाशिवरात्री महोत्सव समितीच्या वतीने महाशिवरात्री महोत्सव २६ फेब्रुवारी ते ६ मार्च पर्यंत आयोजित करण्यात आलेले असून या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची नाविण्यपूर्ण मेजवानी ठेवण्यात आली होती. 
     या महोत्सवाचे उद्घाटन आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम श्रध्येय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी शिवटेकडी लानचे भूमीपूजन आ. बंटीभाऊ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर लगेचच नागभिड तालुका पत्रकार संघ, तथा तळोधी (बा.) पत्रकार संघाचे सर्वं पत्रकार बंधुंना शाल, श्रिफळ, स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 
     यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा, डॉ.राजन जयस्वाल,भाजप ज्येष्ठ नेते वसंत वारजूरकर, माजी जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, गौरव भैय्या ब्रह्मपुरी, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, माजी प्राचार्य डॉ.अमीर धमानी, जि. प. माजी सदस्य संजय गजपुरे,  प्रा.डॉ.उमाजी हीरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम पाथोडे, प्रा,गणपत देशमुख, ॲड.रवींद्र चौधरी प्रसिद्ध डॉ. सतीश चिंतावार सिंदेवाही, ज्येष्ठ व्यापारी गुलजार धमानी, जहांगीर कुरेशी, अँड.आनंद घुटके, प्राचार्य देविदास चिलबुले, मॉर्निंग वॉक संघटनेचे अध्यक्ष निमजे, अनिल लांबट, गुलाब भानारकर, आकरे, समर्थ, जयंती पटेल, यांची उपस्थिती होती.. 
     यावेळी आ. बंटीभाऊ भांगडिया यांचाही महाशिवरात्री महोत्सव समितीने वतिने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग भानारकर यांनी केले, प्रास्ताविक गणेश तर्वेकर यांनी तर आभार संतोष रडके यांनी मानले. कार्यक्रमाला नागभिड- तळोधी येथिल सर्व पत्रकार तथा मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!