सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय पवनी येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस संपन्न

"विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी" - मुख्याध्यापिका सुजाता गजभिये

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.२८/०२/२०२५ सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय पवनी येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्रीय विज्ञान दिन हा दरवर्षी २८ फेब्रुवारी ला साजरा केला जातो.हा दिवस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमन यांनी शोधलेल्या 'रामन इफेक्ट'च्या यादार्थ साजरा केला जातो.या शोधाच्या निमित्ताने त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट: विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे,वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे,विज्ञानाची लोकप्रियता वाढवणे हा आहे. प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी,जेष्ठ शिक्षिका अरुणा कांबळे,विज्ञान शिक्षिका भावना निमजे,अर्चना दडवे,नीता मोटघरे,प्रतिभा रामटेके आदिंची व्यासपीठावर उपस्थिती होती.विज्ञान शिक्षिका भावना निमजे यांनी 'रमन इफेक्ट' हा शोध कसा लागला याविषयी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन सविस्तर मार्गदर्शन केले.तर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी व अंधश्रद्धा दूर करावी याविषयी सविस्तर अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले.यावेळी शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थीनी अनुष्का गजभिये हिने पाण्याचा अपव्यय थांबविणे याबद्दल विज्ञान प्रतिकृती सादर करून त्याचे फायदे सादरीकरणातुन विषद केले.तसेच इयत्ता नववीतील विद्यार्थीनी अनुश्री लोणारे हिने कचर्याचा वापर करून पर्यावरण संवर्धन करता येते याबद्दल सादरीकरण करून विज्ञान प्रतिकृती सादर केली.यावेळी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विज्ञान शिक्षक सिद्धेश्वर फड यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक संदिप मुंडले यांनी केले.कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी तथा शालेय विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!