तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाला लागला ब्रेक
लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्या इच्छा शक्तीचा दिसत आहे अभाव
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - ताडोबा व्याघ्र प्रकल्प लगत दोन हजार वस्तीचे आदिवासी अर्जुनी तुकुम गाव असून या ठिकाणी नागरिकांना सुविधेचा अभाव आजही कायम आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाला मोठ्या प्रमाणात ब्रेक लागलेल दिसून येत असून प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनमुळे जनतेला स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्षानंतरही अनेक सुविधापासून वंचित राहावे लागत आहे.अर्जुनी तुकुम हे गाव वरोरा तालुक्यातील ताडोबातील व्याघ्र प्रकल्प लगत शेवटच्या टोकाला आदिवासी गाव बसलेले,आहे आजही या गावात प्रशासनाची सुविधा पोहोचले नसून या ठिकाणी आजही पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, गावातील मुख्यडांबर रस्ते पंधरा वर्षापासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे, तसेच आरोग्याच्या प्रश्न भेडसावत आहे. आजही नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे त्यामुळे साथीच्या रोगांचे वाढ झाली आहे. तसेच रस्ते खराब असुन वाहतूक व दळणवळणासाठी नागरिकांना त्रास संहन करावा लागत आहे या परिसरातील अर्जुनी, तुकुम येथील पंधरा वर्षापासून सूर्योदय विद्यालय ते फॉरेस्ट नाका, अर्जुनी ते तुकून पर्यंत मुख्यरस्ता वंचित राहिलेला आहे स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर ही गावे डांबर रस्त्याची वाट बघत आहे.याकडे आजही लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!