चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी येथील अतिक्रमण झाले भुईसपाट
नगर पंचायतने बेरोजगारांच्या रोजगारावर चालविले डोजर
नागरिकांमध्ये चर्चेला आले उधाण
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक २८/०२/२०२५ शुक्रवार ला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील तथा भिसी अप्पर तहसील येथील अतिक्रमण धारकांच्या दुकानावर भिसी नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी यांनी डोजर चालविला असून व्यावसायीकांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.या अगोदर चिमूर याठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे चिमूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी अतिक्रमन धारक दुकानांवर डोजर चालवीला होता. परंतु मोठ्यांच्या अतिक्रमनावर डोजर न चालवीता गोरगरीब व्यावसायिक यांच्याच दुकानावर हेतूपरस्पर डोजर चालवीला गेला यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणावर रोष निर्माण झाला आहे. कोट्याधिश धनाढ्य असलेल्या आमदारांनी केलेल्या अतिक्रमनावर डोजर अजूनही चालविल्या गेला नसल्याने सुद्धा चिमूर शहरात चर्चेला उधाण आले आहे. तर चक्क ग्राम पंचायत काळापासून ते नगर परिषद असतांना सुद्धा स्थानिक आमदारांनी शासकीय दुकान गाळ्यात भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालय थाटले असून सर्रास शासकीय नियमाचे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र उघड असतांना देखील जाणीवपूर्वक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहे. तर अनेक दुकान गाळे अशी आहे कि ज्यांना रोजगार निर्मितीसाठी देण्यात आलीत त्यांनी ते दुकान गाळे दुसऱ्यांना भाड्याने दिले असल्याने याकडे नगर परिषदेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का? चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी या सर्व परिसराचा आढावा घेत पुढील पाऊल उचलावे जेणेकरून सर्वसामान्य जनता रोजगारापासून वंचित होणार नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!