शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणामुळे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ शक्य - प्राचार्या रत्नप्रभा भालेराव
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिनांक. २३/०२/२०२५ पवनी येथे तालुका स्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण समारोप प्रसंगी मार्गदर्शन राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरु असून शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजित केले असून त्यामुळे शिक्षकांची क्षमता बांधणी होऊन शालेय शैक्षणिक गुणवत्ता वाढ होईल.जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या आमुलाग्र बदलांचा विचार करता नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक सक्षम होतील असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या रत्नप्रभा भालेराव यांनी शिक्षक प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना आपले विचार व्यक्त केले.शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी येथे दुसऱ्या टप्प्यातील तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात पार पडले.सदर प्रशिक्षणाला त्यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांशी सुसंवाद साधला. त्यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे जेष्ठ अधिव्याख्याता संजयकुमार मेश्राम, कल्पना बानकर, समावेशित तज्ञ जयश्री सावरकर,गटशिक्षणाधिकारी शरदचंद्र शर्मा,शिक्षण विस्तार अधिकारी संजयकुमार वासनिक, सुलभक देवानंद घरत,पुरुषोत्तम भुरे,अमित कहालकर, गणेश गिर्हेपुंजे,जयंत तुळसकर,रेखा नागरीकर, पृथ्वीराज मेश्राम,सुमित संगेल,साधन व्यक्ती डॉ.मुरलीधर रेहपाडे, गटसमन्वयक दिपाली बोरीकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर २०२३, राज्य अभ्यासक्रम आराखडा शिक्षण २०२४, शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा, क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया, क्षमता आधारित मूल्यांकन कार्य नीती, क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य,विविध गटकार्य,समग्र प्रगती पत्र इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थ्यांची शिस्त व शंभर टक्के उपस्थिती यांचे त्यांनी कौतुक केले.सदर प्रशिक्षण पूर्ण होण्यासाठी शिवाजी विज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ.सुरेश बनकर, प्राध्यापक डॉ.विजय लेपसे तथा समस्त कर्मचारी वृंद यांनी प्रशस्त इमारत व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल शिक्षण विभागाने आभार व्यक्त केले.प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी समग्र शिक्षा अभियानचे विषय तज्ञ अरविंद लांजेवार,विठ्ठल रामटेके,कैलास शहारे, सुनील मोटघरे यांनी अथक परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!