प्रधानमंत्री घरकुल योजनेत 10 हजार रुपये मिळणार कमी - महागाईच्या काळात सरकारचा उपराटा निर्णय
सावली (विजय कोरेवार) महागाई दिवसेंदिवस वाढत असतांना व घरकुल योजनेचे बांधकाम करणे आवाक्याबाहेरचे असतांना अनुदानात वाढ करण्या ऐवजी प्रधानमंत्री आवास योजनेत अनुदान कमी केले आहे. देशातील प्रत्येक नागरिकांना आपल्या हक्काचे कुटुंबाला राहण्यालायक घर मिळावे या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी) योजना सुरु आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना 1.50 लक्ष तर शहरी भागातील नागरिकांना 2.50 लक्ष रुपये अनुदान दिल्या जाते. ग्रामीण व शहरी आवास योजनेच्या अनुदानात तफावत असल्याने शहरी प्रमाणेच 2.50 लक्ष देण्याची मागणी होत असतांना मिळणाऱ्या अनुदानतूनही 10 हजार रुपये कमी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कुणीही घराविना बेघर राहू नये, सर्वाना घरे मिळावी याकरिता ग्रामीण भागातील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अनुदान देणे हा योजनेचा उद्देश आहे. सद्या ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दुसरा सुरु झाला असून सरकार गाजावाजा करीत मंजूर प्रमाणपत्र वाटपाचे काम कार्यक्रमाद्वारे 22 फरवरी ला करण्यात आले. रेतीसह सर्व वस्तू महाग झाले असतांना ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना 1.30 लक्ष व रोजगार हमी योजनेतून मजुरीचे 20 हजार रुपये असे तुटपुंजी अर्थसहाय्य दिल्या जात होते. तर शहरी भागातील घरकुलाचे अनुदान 2.50 लक्ष रुपये आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागातील व शहरी भागातील अनुदान पाहता फारच तपावत दिसते. ग्रामिणांना सिमेंट, लोखंड, गिट्टी अशी प्रत्येक वस्तू शहरातील दुकानातून न्यावी लागत असतांना गाडी भाडेही जास्त लागत असतांना उलट शहरी भागातील अनुदानापेक्षा ग्रामीण भागात अनुदान जास्त असायला पाहीजे परंतु ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना अनुदान कमी असल्यामुळे अनुदान वाढीची मागणी होत आहे. मात्र सरकारने अनुदान वाढविण्याऐवजी मिळणाऱ्या अनुदानातून 10 हजार रुपये कमी करून 1.30 लक्ष ऐवजी 1.20 लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!