प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलांना मंजुरी - सावली पंचायत समितीत प्रमाणपत्राचे वाटप
सावली - प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 मध्ये मंजूर झालेल्या घरांचे मंजुरी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम महाराष्ट्रभर घेण्यात आला. सावली पंचायत समितीतही कार्यक्रम घेत प्रमाणपत्राचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 अंतर्गत महाराष्ट्रात 20 लाख घरकुल मंजूर करण्यात आले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुणे येथे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले त्यानुषंगाने ऑनलाईन कार्यक्रम पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात आला. सावली तालुक्यात 4 हजार घरकुल मंजूर असून काही लाभार्थ्यांना पंचायत समिती सभागृहात कार्यक्रमाद्वारे मंजुरी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमचे उदघाटन गटविकास अधिकारी योगेश गाडे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती विजय कोरेवार, तर सहाय्यक गटविकास अधिकारी गजानन तेलकापल्लीवार, गट शिक्षण अधिकारी मोरेश्वर बोन्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन आदेश मानकर यांनी केले तर आभार कृष्णा राऊत यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!