अंधश्रद्धा निर्मूलनाच्या एका कामाने जग बदलणार नाही... -मुक्ता दाभोलकर
वरोरा.... जगदीश पेंदाम
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या एका कामाने जग बदलणार नाही अनेक कामे याच्याबरोबर करावी लागतील. वेगवेगळ्या समूहाचे प्रश्न आहे गरिबीचे प्रश्न आहे जमिनीचे प्रश्न आहे .शेतकऱ्यांचे प्रश्न आहे .अनेक प्रश्न आहे समाजात स्त्री वर्गाचे प्रश्न आहे .जे जे लोक या प्रकारचं जग बदललं पाहिजे अशी धारणा धरून काम करतात. त्यांच्यात एक म्हणजे समविचारी आहे म्हणजे त्यात कुठला तरी बाबा- बुवा भांबावून अंधश्रद्धेने काम करणारा तो कुठला समविचारी नाही. तो त्याच्या इव्हेंटस करिता वाटप
करत असतो. जे भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी जे कटिबद्ध आहे असे सगळेजण समविचारी आहे. त्यांच्या बरोबरीने सोबतीने काम करायचे आहे.
अंधश्रद्धानिर्मूल समिती अशा चतु सुत्रीवर काम करते . असे वक्तव्य सामाजिक चळवळीतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रमुख मार्गदर्शक व प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर सामाजिक कार्यकर्त्या विदर्भाच्या दौऱ्यावर चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमता भद्रावती येथील राजमनी सभागृहात येथे अंनिस कार्यकर्त्यांच्या बैठकीला आले असता त्या बोलत होत्या . मुक्ता दाभोलकर भद्रावती येथे आगमन होताच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिराणिक यांच्या निवासस्थानी जनसंपर्क कार्यालयात मुक्ता दाभोळकर यांनी भेट दिली. प्रसंगी तिराणिक परिवार व स्नेहांकित मित्र मंडळी च्या वतीने औपचारिक स्वागत करून चंद्रपूर कला अकादमीच्या वतीने स्वरा बोंडे चिमुकल्या विद्यार्थिनी आदिवासी वारली पेंटिंग कलाकृती भेट देऊन स्वागत करण्यात आले. बैठकी प्रसंगी राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे, नागपूर कार्यकारणी विभागीय सदस्य विजया श्रीखंडे यांची प्रामुख्याने दौऱ्यात उपस्थिती होती. महाराष्ट्रभर अंनिसच्या सर्वत्र शाखा आहेत अंधश्रद्धांच्या संदर्भात समाजात कुठलीही घटना घडते तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यावर काम करते. वैज्ञानिक जाणीव यावर भर देऊन अंधश्रद्धा विषयावर भर देऊन शाळकरी मुले महाविद्यालयातील युवा तरुण -तरुणी बोलकी झाले पाहिजेत. त्यासाठी अभ्यास पूर्ण
प्रात्यक्षिकासह कार्यशाळा प्रशिक्षण त्या त्या पातळीवर होणे गरजेचे आहे. भानामती, फल ज्योतिष्य ,वास्तुशास्त्र, चमत्काराचे प्रयोग ,महिला विषयक शोषित प्रश्न विविध विषयाच्या अनुषंगाने आपली भूमिका मांडणारा तरुण कार्यकर्ता वर्ग प्रशिक्षित करावे लागणार आहे . त्यासाठी शाळा महाविद्यालयातील युवा पिढी ने वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरून डॉ.नरेंद्र दाभोलकरांची पुस्तके वाचा म्हणजे त्यातून विज्ञान ,निर्भयता, नीती अंनिसच्या चतुसूत्रीचा अनेक बाबींचा उलगडा निश्चित पणे होईल. असे मनोगत बैठकी प्रसंगी अंनिस चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले. जनसंपर्क कार्यालय व कार्यकर्त्यांच्या भेटी बैठकीत बैठकीत डॉ .राहुल साळवे, प्रा. आस्वले, केशवराव तिराणिक, नामदेव रामटेके, श्रीधर भगत, रवी वानखेडे, सुरज शेंडे, अशोक जवादे, समीर आसुटकर, निखिल धोंडरे आकाशदीप कुंमरे, सी. चांदेकर ,शारदा खोब्रागडे, लता टिपले, चंद्रकला गेडाम, सरिता मानकर, अनिता भजभुजे, सुरेखा रामटेके, प्राचार्य डॉ.मंजुषा सागर ,बोंडे मॅडम, अनिता चांदेकर आधी इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!