एकल महिलांच्या जनसंवाद प्रक्रियेतून झाली प्रश्नांची.. सोडवणूक..

एकल महिलांच्या जनसंवाद प्रक्रियेतून झाली प्रश्नांची.. सोडवणूक..

वरोरा... जगदीश पेंदाम

सहा महिन्यापासून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील विस्लोंन, पळसगाव, माजरी, पाटाळा, कुचना त्या पाच गावांमध्ये वेस्टर्न कोल्डफील्ड लिमिटेड (WCL) नागपूर यांच्या आर्थिकसाह्याने तसेच अपेक्षा होमिओ सोसायटी गुरुकुंज मोझरी ता. तिवसा जि. अमरावती डॉ. मधुकर गुंबळे यांच्या सहकार्याने एकल महिला आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रम राबविल्या जात आहे. घटस्फोटीत, परितक्ता, अविवाहित महिलांचां एकल महिलांमध्ये समावेश होतो. कार्यक्रमाचे अनुषंगानेच एकल महिलांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्याचे उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यत भद्रावती तालुक्यातील कुचाना गावांमध्ये शासकीय योजनांवर जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला सदर कार्यक्रमाला गावातील 200 महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून  सुनिता ताई ताजने सरपंच कुचना हे होते. तर प्रमूख पाहुणे म्हणून किशोर बाबरावजी चौधरी सर (विचार विकास सामाजिक संस्था, वरोरा संचालक), बंडू आकनुरवांर सहायक गटविकास अधिकारी, भद्रावती, प्रवीण ताजने पोलीस पाटील पळसगाव, योगिता बंड पोलीस पाटील कुचना, यांच्या प्रमूख उपस्थितीत आरोग्य, शिक्षण, रोजगार, राशन तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ, वृद्ध पेन्शन योजना एकात्मिक बालविकास द्वारे राबविण्यात येणारी बालसंगोपन योजना, एकलं महिलांचा घरकुलाचा प्रश्न, जागा नावावर नसणे, जमिनीचा सातबारा वारस नोंद बद्दलची अनभिज्ञता इत्यादी उपरोक्त विविध विषयांवर शासकीय अधिकाऱ्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच भद्रावती तालुक्याचे तहसीलदार राजेश भांडारकर यांनी कार्यक्रमात फोनद्वारे महिलांशी संवाद साधून घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्याचें आश्वासन दिले.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली मोरेश्वर व्यापारी यांनी केले, कार्यक्रमाचे प्रस्तावना मनूताई वरठी यांनी केले,एकल महिला प्रश्न सादरीकरण सोमेश्वर चांदुरकर यांनी केले. सदर कार्यक्रमातून अपेक्षा एवढीच की एकल महिलांना पतीचा साथ नसतानाही एकट्याने त्या कुटुंबाचा गाडा यशस्वीरीत्या ओढण्याचा प्रयत्न करतात, शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी त्यांना शासकीय अडचणी निर्माण होतात त्याचे निराकरण व्हावे, त्यात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, घरकुलाचा प्रश्न आहे, राशनचा प्रश्न, खूप वर्ष होऊनही निराधार योजनेचा लाभ न मिळू शकणाऱ्या महिला ज्यात अनुसया पिंपळकर, (विस्लोंन), कविता सोयाम (पाटाळा), लता कोळमेथे (माजरी) घरकुलाचा प्रश्न... असे एक ना अनेक प्रश्न कमीवयातील महिलांना भेडसावत आहे. त्या प्रश्नाचे निराकरण शासन दरबारी लवकरात लवकर व्हावे. अशी विनंती शासन दरबारी एकल महिला, परीतक्ता, घटस्पोटीत आणि अविवाहित महिला करीत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!