शेतकरीमित्रांच्या न्याय हक्कासाठी शेवटपर्यंत लढा देणार! - काॅ. विनोद झोडगे

शेतकरीमित्रांच्या न्याय हक्कासाठी शेवटपर्यंत लढा देणार!
       - काॅ. विनोद झोडगे 

यश कायरकर:- 
          कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तेरा वर्षांपर्यंत कार्यरत असलेल्या शेतकरी मित्रांना आर्थिक बजेटच्या नावाखाली कामावरुन बंद केले. परिणामी कृषी विभागाचा शेतकऱ्यांशी असलेला संपर्क कमी झाला. व अनेक शेतकरी विविध योजनापासुन कोसो दुर राहिले. तर अल्पशा मानधनावर काम करणारे शेतकरी मित्रही बेरोजगार झाले. अल्पशा मानधानावर काम करण्याची इच्छा असणाऱ्या शेतकरी मित्रांना कृषी विभागाने पुर्ववत कामावर घ्यावयासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी शेवट पर्यंत मी लढेण असी ग्वाही काॅ. नेता विनोद झोडगे यांनी दिली. 
   चंद्रपूर जिल्हा शेतकरी मित्र संघटनेच्या वतिने सिंदेवाही येथे आयोजित मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतं होते.
       या मेळाव्याचे अध्यक्ष जिल्हा शेतकरी मित्र संघटनेचे अध्यक्ष किशोर निभ्रड हे होते. तर मार्गदर्शक म्हणून काॅ. एन. टी. मस्के, जिल्हा सचिव राहुल रामटेके, काॅ. मारोती घागरगुंडे, आदी मान्यवरांनी याववेळी मेळाव्याला मार्गदर्शन केले.
    जो पर्यंत शेतकरी मित्रांना कामांवर कायमस्वरूपी घेतले जाणार नाही तो पर्यंत स्वस्थ बसणारं नाही असे यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शनातून मनोगत व्यक्त केले. लवकरच जिल्हाधिकारी यांचे समोर धरणे आंदोलन, तर जिल्ह्यातील सर्वच आमदारांना घेराव आंदोलन करण्याचे नियोजन या मेळाव्यात करण्यांत आले. या मेळाव्याला गजानन भुरले, सुमंत वैरागडे, राजू आंबोरकर ब्रम्हपूरी, साहेबराव घुगूल कोरपना, पल्लवी रामटेके चिमुर, उमाकांत वाघळे सावली यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याचे प्रास्ताविक राहुल रामटेके, संचालन जीवन भरडे, तर आभार प्रदर्शन दिपक चाहांदे यांनी केले. या मेळाव्याला चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वंच तालुक्यातील शेतकरी मित्र उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी करण्याकरिता सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी मित्रांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!