प्रबुद्ध विचार मंच व बौद्ध बांधवाचे वतिने तहसिलदार यांना निवेदन.
प्रबुद्ध विचार मंच व बौद्ध बांधवाचे वतिने तहसिलदार यांना निवेदन.
तळोधी: प्रतिनिधी:-
प्रबुद्ध विचार मंच व नागभिड तालुक्यातील बौद्ध समाज बांधव यांच्या वतीने मुख्यमंत्री व राष्ट्रपती यांना तहसिलदार यांच्या मार्फत अप्पर तहसिल कार्यालय तळोधी (बाळापूर) येथे निवेदन देण्यात आले.
निवेदनाच्या माध्यमातून परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली. त्याचा निषेध करण्यासाठी परभणीतील समाज बांधवांनी मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी निर्दोष लोकांना बेदम मारहाण केली, कोंबीग च्या नावावर समाज बांधवांना घरात घुसून पकडून जेलमध्ये टाकले. त्यात ॲड.सोमनाथ सूर्यवंशी यांची जेलमध्ये हत्त्या करण्यात आली.या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी.व बौद्ध बांधवांवर नोंदविलेले गुन्हे मागे घ्यावे.अशा मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
तसेच काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या अपमान जनक वक्तव्याचा निषेध करून गृहमंत्री अमित शहा यांनी पदाचा राजीनामा द्यावा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.या मागणीसाठी राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देण्यासाठी प्रबुद्ध विचार मंचाचे अध्यक्ष के डी मेश्राम, उपाध्यक्ष राजकुमार पाटील, वाढोणा सरपंच देवेंद्रजी गेडाम, दुर्गेश रामटेके, मेघराज खोब्रागडे, परमेश्वर मडावी, बिआरएसपी विधानसभा प्रमुख निकेश रामटेके, बाजीराव रामटेके, मनिष शेंडे, पत्रकार राहुलजी रामटेके, विकास गोडांने,अनुप खोब्रागडे, बुद्धभूषण रामटेके,निशांत शेंडे, प्रेमदास जनबंधू, संदेश सोनटक्के, दिपक उराडे,प्रतिक सोनटक्के, केवळ खोब्रागडे, ज्ञानेश्वर मेश्राम, परसराम चौधरी,अनुप सोनटक्के, प्रणय खोब्रागडे, अक्षय मेश्राम, आदर्श मेश्राम,महेश रामटेके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!