चौंसठयोगिनी पूजन, सत्संग व पंचकुंडीय यज्ञ संपन्न.।.

चौंसठयोगिनी पूजन, सत्संग व पंचकुंडीय यज्ञ संपन्न.।.

वरोरा.... जगदीश पेंदाम

 क्षेत्र रामदेगी येथे चिंताहरण कपिश्वर देवस्थान द्वारा आयोजित चौंसठयोगिनी पूजन, सत्संग व पंचकुंडीय यज्ञ कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सत्संग,प्रवचन समाजप्रबोधन प.पू.मंगेश महाराज यांनी केले.. 

चौंसठयोगिनी उत्पती मनुष्य जीवनात त्याचे महत्व व योगिनीचे भारतात असलेले ठिकाण अशा अनेक विषयावर  त्यानी मार्गदर्शन केले व समाजातील युवक युवतीवर होणारा पाश्चात्य संस्कृतीचा दुष्परिणाम रामायण,महाभारत अशा दिव्य ग्रंथातील प्रसंग व दृष्टन्त महाराजांनी आपल्या सत्संग,प्रवचनातुन सांगितले
या कार्यक्रमाचे संकल्पना सूत्रसंचालन व पौरोहित्य पं.सतिश गुरुजी यांनी केले.  यावेळी उपस्थित विदर्भातील नागपूर, उमरेड, चिमूर, वरोरा,चंद्रपूर, गडचांदूर यवतमाळ, वणी येथील भाविक भक्त व साधक उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे ह.भ.प.फलाहरी महाराज,  हनुमंतराव कारेकार, गणपतराव डाये,देवा महाराज, ह.भ.प. शंकर महाराज,ह.भ.प. जीवन महाराज, विशेष सहाय्य  प्रणय लोणकर,दशरथ ठावरी 
कार्यक्रमला  यशस्वी व सहकार्य करणारे हर्षल महाले रमेश भोयर, सुरेंद्र वांढरे,प्रदीप पबदकी,प्रकाश कंगाले(गुरुजी),दिनेश सोनुने,गोविंद महाले, प्रभाकर बारेकर, बालकिसन तामखाने,गणेश भुजाडे,झलाबाई इत्यादीनी केले....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!