सुगंधीत तंबाखूची मोठ्या प्रमाणात साठवणूक, विक्री अन्न व औषध प्रशासन गप्प का?

सुगंधीत तंबाखूची मोठ्या प्रमाणात साठवणूक, विक्री
अन्न व औषध प्रशासन गप्प का?

मुल (प्रतिनिधी)
मुल तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखूची विक्री/ साठवणूक होत आहे. शालेय विद्यार्थी, महिला, नागरिक या व्यसनाला मोठ्या प्रमाणात बळी पडले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु अन्न व औषध प्रशासन विभागा कडून तालुक्यातील सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर  कारवाई होत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

गुटखा आणि पानमसाला बंदीची व्याप्ती वाढवून सुगंधित तंबाखू, सुंगधित सुपारी अथवा खर्रा (मावा) यांच्या खुल्या आणि बंद पॅकेटमधील विक्री, साठवणूक अथवा वितरणाला २०१३ पासून बंदी घालण्यात आली आहे. परंतु जिल्ह्यात या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे सुगंधीत तंबाखूची तालुक्यात, विशेष करून ग्रामीण भागात आयात/ निर्यात सुरू आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडे सुगंधीत तंबाखू विक्रेत्यांची नोंद आहे. ही नोंद गृहित धरूनही तपासणी, धाडी किंवा कारवाई झालेली नाही. एफडीएच त्याबद्दल गंभीर नसल्याने सुगंधीत तंबाखू व्यावसायिक व शौकिनांचे सुगीचे दिवस आहेत.

"कॅन्सर रुणांमध्ये ४० टक्के प्रमाण तोंडाच्या कॅन्सरचे असून त्यापैकी ७० टक्के रुग्णांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याने कॅन्सर झाला आहे असे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. भेसळयुक्त सुगंधीत तंबाखूचे स्वतंत्रपणे  घटक विक्री करून सेवन होत आल्याने यामुळे भावी पिढीवर विपरित परिणाम होत आहे."

तालुक्यातील शहरातील काही वॉर्डातील व ग्रामीण खेडे गावात होत असलेली अवैध्य सुगंधित तंबाखूची साठवणूक/ विक्री यावर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे नागरिकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!