मीराश्री बहुउद्देशीय संस्थेद्वारा स्वाब संस्थेचा पर्यावरणातील योगदानाबद्दल सत्कार.
मीराश्री बहुउद्देशीय संस्थेद्वारा
तळोधी (बा):-
नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील मीराश्री बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित सावरगाव, कन्हाळगाव, वाढोणा येथील गुरुकूल इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंटतर्फे लोकविद्यालय सावरगाव शाळेच्या प्रांगनात 'सांस्कृतिक कलाविष्कार' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मीराश्री बहुउद्देशीय संस्थेद्वारे ब्रह्मपुरी ,नागभीड, शिंदेवाही, चिमूर या चारही तालुक्यात पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी मोलाची योगदान दित प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान राबवून निसर्गाची सेवा, वृक्षारोपण, मानव वन्यजीव संघर्ष, गावागावात जाऊन साप आणि वाघ याबद्दलच्या श्रद्धा अंधश्रद्धा या विषयावर जनजागृती कार्यक्रम, स्वखर्चातून आयोजित करणार्या स्वाब संस्थेचा शाल ,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी स्वाबचे महिला सदस्य मंजूशा घुगूस्कर, अर्चना आंबोरकर, मधू बोरकर, जानवी बोरकर, मेघा गायधने,प्रतीक्षा चौधरी , जुही आदे तसेच जिवेश सयाम, छत्रपती रामटेके, स्वप्निल बोधनकर, नितीन भेंडाळे,अमीर करकाडे, जीवन गुरनुले, शुभम निकेशर, अमन करकाडे, भोलेनाथ सुरपाम, गणेश गुरनूले, गिरीधर निकूरे, इ. पदाधिकारी उपस्थित होते.
मिराश्री संस्थेचे सचिव कैलास बोरकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ समाजात महत्त्वाचे योगदान देत कार्य करणाऱ्या करता पुरस्कार देण्याच्या उद्देशाने हा सत्कार सोहळा व चिमुकल्यांच्या कलाविष्काराचा उदय व्हावा, त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास व्हावा, यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे उदघाट्न वाढोणाचे सरपंच देवेंद्र गेडाम यांनी केले. अध्यक्षस्थानी मीराश्री बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष माधुरी बोरकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमुख सावरगावचे उपसरपंच प्रवीण खोब्रागडे, कन्हाळगाव चे उपसरपंच लीलाधर बोरकर , ग्रा.प.सदस्य युवराज रामटेके, स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, मीराश्री बहुउद्देशीय संस्थेचे सचिव कैलास बोरकर, संतोष दुर्वा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!