झुंजीतील जखमी वाघाला पकडण्यात वन विभागाला यश. नागभीड वनपरिक्षेत्रातील घटना.

झुंजीतील जखमी वाघाला पकडण्यात वन विभागाला यश.
नागभीड वनपरिक्षेत्रातील घटना.
यश कायरकर:
    ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी मधील नागभीड वनपरिक्षेत्रामध्ये गेल्या चार जानेवारीला दोन वाघांची झुंज झाली होती. त्यामध्ये दोन्ही वाघ हे गंभीर जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी व मोक्का पंचनामा केल्यानंतर आढळले होते. त्यानंतर वन विभागाने दोन्ही वाघावर पाळत ठेवलेली होती. मात्र त्यातील एक वाघ कुठेतरी दूर निघून गेल्याचे व एक परिसरातील वाघ हा त्याच परिसरामध्ये फिरत असल्याचे असल्याने वन विभाग त्यावर बारीक लक्ष ठेवून होते. तसेच परिसरातील लोकांना सावधानतेचा इशारा देत देण्यात आलेला होता. मात्र त्यातच काल 10 जानेवारीला एका वाघाने परिसरातील  पारडी (ठवरे) येथील शेतकरी गुरुदेव पुरुषोत्तम सारये (वय 42) या शेतकऱ्याला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर चौकशी केली असता शेतकऱ्यावर हमला करून जखमी करणारा वाघ हा झुंजीतील जखमी वाघ असल्याचे आढळून आले. व त्यातच वाघ हा जखमी असल्यामुळे कोणतीही  शिकार करण्यात असमर्थ असल्याचे निदर्शनास आले, व हा आठवडा भर उपाशीपोटी होता त्यामुळे त्याने शेवटी मानवावर हमला केला त्यानंतर वन विभागाने वेगाने चक्र चालवीत वरिष्ठांकडून परिसरातील लोकांच्या मागणी नुसार या वाघाला पकडण्याची परवानगी प्राप्त केली व आज सकाळी या जखमी वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश मिळाले.
     पकडण्यात आलेला वाघ हा कक्ष क्रमांक 110, कोसंबी (गवळी) बीट, नागभीड वनपरीक्षेमध्ये पकडण्यात आला पकडण्यात आलेला नर वाघ हा T- 100  आय डी असलेला,अंदाजे दहा ते अकरा वर्षे वयाचा असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. या वाघाला पकडल्यामुळे वन विभाग व परिसरातील जनतेने सुटकेचा निश्वास सोडला. तर आता या वाघाला पकडून चंद्रपूर येथील TTC नेण्यात आले.
या वाघाच्या रेस्क्यू वरिष्ठांच्या आदेशानुसार रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) TATR, जलद बचाव पथक, TATR, 
अजय सी.मराठे.पोलीस हवालदार नेमबाज, आरआरटी सदस्य विकास ताजने ,योगेश लकडे, प्रफुल वडघुरे ,गुणानक ढोरे,दिपेश टेंभुर्णे ,वसीम शेख ,आरआरटी ​​चालक -अमोल कोरपे ,अक्षय दांडेकर, नूर अली सय्यद वन्यजीव जीवशास्त्रज्ञ (मध्य चांदा) यांच्या सहकार्याने वाघ पकडले.      
     यावेळेस राकेश सेपट उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी , ब्रह्मपुरी वन विभागाचे बायोलॉजिस्ट राकेश अहुजा, नागभीड वन परिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार, क्षेत्र सहाय्यक सय्यद, नेरलवार, तावाडे , वन रक्षक कुथे, नवघडे, कुळमेथे व नागभीड वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वन कर्मचारी व वन मजूर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!