ऐतिहासिक वास्तूत घाणीच्या साम्राज्याचे वास्तव्य - पुरातत्व विभागाचा कानाडोळाचांदापूर येथील ऐतिहासिक 'बारव' दुर्लक्षित

चांदापूर येथील ऐतिहासिक 'बारव' दुर्लक्षित


      मूल तालुक्यात वैनगंगेच्या काठावर वसलेले चांदापूर हे गाव ऐतिहासिक व धार्मिक बाबतीत नावलौकीकास प्राप्त असले तरी या गावाकडे पुरातत्व विभाग व शासन प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे .
         चांदापूर ज्या टेकडीवर बसलेय आणि सभोवताली असलेल्या टेकड्यांवर कित्येक ऐतिहासिक घटना घडल्या असतील पण त्याची नोंद आणि टेकड्यांवर असलेल्या गुंफा व बारव अजूनही दुर्लक्षित आहेत .
    गावाच्या मध्यभागी एक पुरातन बारव असून त्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने तिथे घाणीचे साम्राज्य वास करीत असल्याचा प्रत्यय  झाडीबोली साहित्य मंडळाचे सचिव लक्ष्मण खोब्रागडे व त्यांचे सहकारी केदारनाथ सोनूले व जितेंद्र लेनगुरे यांना त्याच गावात कार्यरत मुख्याध्यापक अनिल नैताम व विषय शिक्षक रुपेश परसवार यांनी आणून दिला .
          त्याची दखल घेत प्रत्यक्ष भेट देऊन संबंधितांनी या ऐतिहासिक बारवचे पुरातत्व विभागाने जीर्णोद्धार करून अनमोल वारस्याचे जतन करावे.  अशी मागणी याद्वारे शासनाकडे केली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!