जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गोविंदपूर बीट स्तरीय बालकिडा व सांस्कृतिक स्पर्धेत अव्वलस्थानी.
तळोधी बा.-----पंचायत समिती नागभीड अंतर्गत बीट वाढोणा च्या बीट स्तरीय बालकिडा व सांस्कृतिक स्पर्धा 2024-25 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गिरगाव येथे दिनांक 11 व 12 जानेवारी 2025 ला पार पडल्या. या स्पर्धेत जि.प.उ.प्रा.शाळा, गोविंदपूर या शाळेनी खो-खो, कबडडी, रिलेरेरा, उंचउडी, गोळाफेक, 200,400 मीटर धावणे या स्पर्धेसोबतच सांस्कृतिक स्पर्धेत सुध्दा अव्वल स्थान प्राप्त केले आहे. शाळा प्राथमिक विभाग चॅम्पीयन ठरली आहे.
या स्पर्धेकरीता खेळाडू विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक श्री. डिमदेव भोयर, शिक्षकवृंद श्री मारोती चौधरी, श्री.नामदेव भुरे, श्री. देवेंद्र पर्वते, श्री.रविंद्र पाकमोडे, श्री. लोकेश हरिनखेडे, श्री. जितेंद्र गोबाडे, सौ. संध्या नाकाडे, सौ. भाग्यश्री सिडाम शा.पो.आ कर्मचारी श्री. मनोज झोडे यांनी परिश्रम घेतले.
गटशिक्षणाधिकारी श्री. संजय पालवे सर, केंद्र प्रमुख श्री. राजेंद्र हटवार सर विशेष शिक्षक श्री. नरेश काशिवार व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. महेंद्र दुधकुरे व इतर सदस्य व गावकऱ्यांनी शाळेचे अभिनंदन केलें आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!