चिमूर शहरात जुगार अड्डयावर पोलिसांची धाड

३५ ते ४० जणांवर गुन्हे दाखल 

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वांत मोठी घटना 

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर क्रांती भूमिमध्ये खुलेआम अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु असून पोलीस प्रशासनाने धाडसत्र अभियान राबविणे सुरु केले असून नेहरू चौक येथील अजय रेस्टॉरंट याठिकाणी तथा उपजिल्हा रुग्णालय समोरील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या मागे शेतामध्ये असलेल्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असल्याने त्याठिकाणी सापळा रचून छापेमारी केल्याने घटनास्थळी अंदाजे ३५ ते ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.या घटनेचा पुढील तपास अजूनही पोलीस करीत असून चिमूर शहरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे अवैध व्यवसाय सुरु असून त्यावरही पोलीस छापेमारी करणार काय? अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!