पंचायत समितीने पटकवीला सदभावना क्रिकेट चषक - सावली पोलिस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम

सावली -  महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमीत्याने पोलीस स्टेशन सावली च्या वतीने 'चला एकत्र येऊया..' या घोषवाक्याने सद्भावना क्रिकेट चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. 6 जानेवारी ला पार पडलेल्या अंतिम सामन्यात सावली पंचायत समितीने प्रथम येत चषक पटकवीला तर सावली पोलीस स्टेशनने द्वितीय स्थान पटकाविला.
      महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लूरवार यांच्या संकल्पनेतून सदभावना क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्याचे दुसरे वर्ष आहे. तालुक्यातील पत्रकार संघ, पोलीस विभाग, तहसील विभाग, सरपंच संघ, पोलीस पाटील संघ, पंचायत समिती, पाटबंधारे, महावितरण, आपदा संघ, व्यापारी संघ खेळात सहभागी झाले होते. 

यावेळी विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला सद्भावना क्रिकेट चषक मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांकडून देण्यात आला, पंचायत समिती संघाचे खेळाडू आमिर पठाण यांना उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून चंद्रशेखर गुरूनुले यांना चषक देण्यात आला.

यावेळी मंचावर तहसीलदार सावली प्रांजली चीरडे, सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुल्लूरवार , पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रासकर , सहाय्यक वनसंरक्षक खेडीकर , उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार, नगरसेवक विजय मुत्यालवार, नगरसेवक सतीश बोम्मावार, नगरसेवक प्रफुल वाळके, पत्रकार उदय गडकरी, पत्रकार सूरज बोम्मावार, प्रवीण गेडाम उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!