कौस्तुभ रामटेके जिल्हा क्रिकेट संघात
मुल येथील कौस्तुभ अभय रामटेके यांची जिल्हा क्रिकेट संघामध्ये निवड झाली असून तो विदर्भ स्तरीय क्रिकेट स्पर्धेत आता भाग घेणार आहे.
कौस्तुभ हा इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे. 14 वर्षाखालील वयोगटात, चंद्रपूर जिल्ह्याच्या क्रिकेट संघामध्ये त्याची निवड झाल्याने तो विदर्भस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
क्रिकेटच्या जिल्हा संघात पात्र ठरलेला कौस्तुभ हा एकमेव खेळाडू आहे. कौस्तुभ हा उच्च प्रतीचा बॉलर असल्याची माहिती त्यांच्या पालकांनी दिली.
कौस्तुभ च्या यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन केले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!