तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कला स्पर्धेत चांदापूर जिल्हा परिषद शाळेचे सुयश


मुल - जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कला संमेलनाचे आयोजन मुल तालुक्यातील कवडपेठ आयोजित करण्यात आले होते. त्यात चांदापूर येथील जिल्हा परिषद शाळेने प्राथमिक व माध्यमिक गटात मुलींनी खो - खो खेळात प्रथम स्थान पटकवीत इतर खेळातही प्रविण्य मिळविले आहे.

        चांदापूर शाळेने तालुका स्तरीय बाल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत माध्यमिक विभागात खो - खो मुली प्रथम, रिले रेस मुली प्रथम, 400 मीटर दौड मुली प्रथम, उंच उडी मुले प्रथम, 400 मीटर दौड मुले द्वितीय, रिले रेस मुले द्वितीय, 200 मीटर दौड मुली द्वितीय तर प्राथमिक विभागात खो-खो मुली प्रथम, रिले रेस मुली प्रथम, उंच उडी प्रथम, 100 मीटर दौड मुली द्वितीय, 200 मीटर दौड मुली द्वितीय

असे चषक मिळवून चांदापूर शाळेने यश प्राप्त केले. विद्यार्थ्यांच्या या यशात शाळेचे मुख्याध्यापक अनिल नैताम, सहाय्यक शिक्षक सुरेश जिल्हेवार, रुपेश परसावार, शिक्षिका कु. निमगडे, कु. रोकमवार, कु. सूर्यवंशी या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे चंदापूरवासी कौतुक करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!