स्थानिक गुन्हे शाखेची अवैद्य दारू वाहतूक करणारे विरुद्ध कारवाई

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. वरोरा हददीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की,  एका पांढऱ्या रंगाच्या स्विप्ट डिजायर गाडी मध्ये अवैध्यरित्या देशी दारु वाहतूक करुन विक्री करिता नेत आहे, अशी खात्रीशीर माहितीवरुन वरोरा कडून नागपुर कडे जाणाऱ्या रोडवरील खालसा धाबा खांबाडा समोर नाकाबंदी केली असता स्विफ्ट डिजायर गाडीचा चालक गाडी न थांबविता थोड्या समोर जाऊन रोडच्या कडेला लावून पळून गेला सदर वाहनाची पाहणी केली असता वाहनामधे देशी  दारूच्या प्रत्येकी 90 ml  2800 नीपां(28 पेटी) किंमत 98,000/- रू. चां तसेच स्विफ्ट डिजायर गाडी किंमत 3,00,000/- रू.  असा एकूण 3,98,000/-रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष कारवाई करून जप्त करण्यात आला.आरोपी विरुध्द पो.स्टे. वरोरा येथे अपराध क्रमांक  47/2025 कलम 65  अ (अ ),83 म.दा.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कार्यवाही पथक पो.उफ.नि मधुकर सामलवार ,स.फौ.स्वामीदास चालेकर,धनराज करकाडे ,पो हवा. नितीन कुरेकार, दिपक डोंगरे, दिनेश अराडे पोअं.प्रशांत नागोसे , शशांक  बदामवार,गोपीनाथ नरोटे सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!