राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त मतदान केंद्रावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे सत्कार

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
 
वरोरा : - सन २०२४ मध्ये 75 वरोरा विधानसभा संघाअंतर्गत उत्कृष्ट काम करणारे पर्यवेक्षक/ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावर मतदान यादीचे अद्ययावतीकरण, तक्रारीचे निवारण राबविले नाविन्यपूर्ण उपक्रम या कार्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा सी.जी यांच्या हस्ते उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पुरस्कार 2025 चंद्रपूर कार्यालय येथे  देण्यात आला आहे. यामध्ये वरोरा तालुक्यातील शेगावचे मंडळ अधिकारी अजय निखाडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरोरा येथे कार्यरत असलेली शिपाई पदावर अनिल वाघमारे, तसेच भद्रावती तालुक्यातील आशा वर्कर ज्योती आसनपल्लीवार यांच्या समावेश आहे.यावेळी उपस्थित निवडणूक उपजिल्हाधिकारी चौधरी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी लटारे, उपविभागीय अधिकारी चंद्रपूर पवार, तहसीलदार चंद्रपूर पवार आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!