युवकाचा अपघातात मृत्यू - खेडी जवळील घटना
युवकाचा अपघातात मृत्यू - खेडी जवळील घटना
सावली - सकाळी सावलीवरून दुचाकीत पेट्रोल भरून खेडीकडे जात असतांना विरोधी दिशेने येणाऱ्या MH= NU 1895 या कारने जोरदार धडक दिल्याने सत्यवान तुळशीराम मडावी वय 42 हा युवक गंभीर जखमी झाला. त्यास ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचाराकरीता भरती केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आईचा लहानपणीच मृत्यू झाल्याने पत्नी व वडिलांसह खेडी येथे राहत होते. वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक चांगला युवक गमावल्याने खेडीत शोककळा पसरली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!