राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत तळोधी नागभीडचे विद्यार्थी चमकले

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत तळोधी नागभीडचे विद्यार्थी चमकले

तळोधी बा.------
अबॅकस स्पर्धा आठ डिसेंबर रोजी नागपूरला घेण्यात आली.साई अब्याकस चे एकूण 11 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता 
या स्पर्धेत साई अबॅकस सेंटरचे विद्यार्थी पाच मिनिटात शंभर गणित सोडवून पारितोषिक मिळविले आहेत यामध्ये डी विभागात पहिला क्रमांक आरुष राहुल पोशट्टीवार तिसरा क्रमांक प्रचित सुनील कामडी आणि बी विभागा मध्ये पहिला क्रमांक सम्यक पटरंगे व तिसरा क्रमांक यथार्थ विजय धांडे यांनी पटकविलेला आहे.या स्पर्धेत आरुष राहुल पोशट्टीवार ,सम्यक पटरंगे, प्रचित सुनील कांबळे, यथार्थ विजय धांडे, अद्विका आंबोरकर पराते. गरिमा नितेश रामटेके आराध्या चानेकर वैभवी बावनकर  
अंशुल चनेकर आरुष गोंडाने.या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय साई अब्याकस च्या संचालिका शीतल पोशट्टीवार यांना दिले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!