ताडोबा येथील जिप्सी अधिकृत की अनधिकृत?
प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या संगम मताने हि वाहतूक सुरु तर नाही ना?
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र येथे स्थित आहे. देशातील विदेशातील पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी येत असतात. पर्यटकांना कोअरझोन मध्ये तसेच बफर झोन मध्ये व्याघ्र दर्शन करण्यासाठी जिप्सीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामध्ये जिप्सी प्रमाणेच बनावटी इतर कंपन्यांचे वाहन सुद्धा रिसॉर्ट मध्ये वापरल्या जात असतात. जिप्सी ही पेट्रोलची असते त्यामुळे पर्यवारणाला यामुळे हानी पोहचत नाही हेही तेवढेच सत्य आहे. परंतु काहीजण चक्क जिप्सी वाहणाला इलेक्ट्रिक वाहन बनवून जंगल सफारी करीता या वाहणाचे सर्रास वापर करीत आहे. अशा प्रकारच्या जिप्सी वाहणाला कुठल्याही प्रकारची आरटीओ परवानगी नाही. अशाच एका जिप्सीवर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दोन महिने अगोदर कारवाई केली होती. त्या जिप्सीवर कारवाई केली आणि पोलीस स्टेशनला त्या वाहणास जप्त केले होते. त्यानंतर या जिप्सीला मॉडीफाय करण्यात आलेले होते. व या जिप्सी वाहणावर योग्य ती कारवाई केली किंवा नाही हे अजूनही बंद बस्त्यात आहे. परंतु ते वाहन का सोडण्यात आले ते अजूनही समजले नाही? प्रवासी यात्री या वाहनांनाच परवाना असतो. ते सर्व वाहन कमर्शियल म्हणजेच पर्यटन व्यवसायासाठीच असतात. ऑल इंडिया परमिट टुरिस्ट परमिट व इतर प्रकारचे परमिट असलेल्या वाहनांना प्रवासी वाहतूक करता येते. ताडोबा येथे खाजगी वापरात येणाऱ्या जिप्सींना पर्यटक वाहतुकी करीता वापरले जाते.हे सर्व नियमानुसार अनाधिकृत असून प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांनी यावर अजूनपर्यंत कुसल्याही प्रकारची कारवाई केलेली दिसत नाही? कित्येक जिप्सी यामध्ये बदल करून पेट्रोल इंजन काढून इलेक्ट्रिक बॅटरीवर करण्यात आलेले आहे. या जिप्सीना कसल्याही प्रकारची आरटीओ परवानगी न घेता हे वाहन सर्रास जंगल सफारी करीता वापरले जात आहे.जेव्हा या वाहनांना प्रवासी वाहतूक परवानाच नाही तेव्हा कसल्याही प्रकारची सुरक्षा व प्रवास्यांना अपघाती विमा अपघात घडल्यास वेळेवर मिळणार नाही. खाजगी जिप्सी यांना स्वतःच्या घरी कुठेही ये - जा करण्यास वापरण्यासाठीचे तयार केले असते त्यास खाजगी वाहन म्हटले जाते.त्या वाहणाची नंबर प्लेट हि पांढऱ्या रंगाची असते.त्याचप्रमाणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रत्येक सीट नुसार विमा काढला जातो विमा काढल्यानंतर प्रवास्यांना अपघाती विम्याचे लाभ दिले जाते.आणि अशा प्रकारच्या बेकायदेशीर जिप्सी ला पर्यटक वाहन म्हणून वापरले जातात यावर प्रादेशिक परिवहन व अधिकारी कुठल्या प्रकारची कारवाई करनार हे पाहणे लक्षणीय आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!