राहत्या घरीच गळफास घेत युवकांची आत्महत्या बेरोजगारी मुळे आणखी एक बळी

राहत्या घरीच गळफास घेत युवकांची आत्महत्या 
बेरोजगारी मुळे आणखी एक बळी 

वरोरा....जगदीश पेंदाम

शेगाव बु मधील बेरोजगार युवक आकाश गुलाब कथवटे वय वर्षे २८ याने आज सकाळी अंदाजे ९/१० च्या सुमारास आपल्या राहत्या घरीच पंख्याला लटकून आपली जीवन यात्रा संपवली.
सविस्तर वृत्त असे कि आकाश हा बेरोजगार असून वडिलांच्या पाणटपरी वर हातभार करीत होता. घरी शेतीवाडी नसल्या कारणांनी एकट्या पाणटपरीच्या भरोशावर सगड कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे शक्य होत नसल्याने बेरोजगारी त्याला नेहमीच सतावत असायची. शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नसल्या कारणांनी व वाढत चाललेल्या वयामुळे त्रस्त झालेल्या आकाशला जीवन जगून संघर्ष करण्यापेक्षा जीवनायात्रा संपवणे अधिक सोयीस्कर वाटले असावे. 
 अशा प्रकारे बेरोजगारी मुळे आणखी एका युवकांचा बळी गेल्या कारणांनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. व सरकार आता तरी रोजगारा बद्दल काही सकारात्म्मक विचार करणार का? अशा भावना परिसरात जनतेच्या मनात निर्माण होत आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करत शव विच्छेदन करण्याकरीता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाटविण्यात आले असुन अधिक तपास शेगाव चे ठाणेदार योगेंदसिंग यादव यांचे मार्गदर्शनात  शेगाव पोलीस करीत आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!