आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु - उपोषणाकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष
आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु - उपोषणाकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष
सावली - चंद्रपूर जिल्ह्यतील व सावली तालुक्यातील आदिवासी समाजा च्या विविध मागण्या घेऊन अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद यांनी तहसील कार्यालय सावली समोर आमरण उपोषणाला गुरुवारपासून सुरवात करण्यात आली आहे. उपोषणाचा दुसरा दिवस असतांना तालुका प्रशासन काहीच दखल घेताना दिसत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने उपोषण स्थळी पोलीस प्रशासनही तैनात नाही.
सावली येथील स.क्र. ७९७ व ७९८ ही जागा आदिवासी विद्याथी मुली, मुले यांच्या वस्तीगृहासाठी उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसह इतर आदिवासी समाजाच्या विविध मागण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद जिल्हा अध्यक्ष अतुल कोडापे चंद्रपूर, अशोक कन्नाके, पुरण बापू मडावी, रमेश कन्नाके, उत्तम गेडाम हे आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा दुसरा दिवस असून तालुका प्रशासन सोडवू शकेल अशा मागण्याबाबत कोणीही अधिकारी चर्चा करण्यास तयार नाही. आंदोलन, उपोषण सुरु असतांना त्या ठिकाणी पोलीस सुरक्षा आवश्यक असते मात्र एकही पोलीस तैनात नाही.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!